दिवाळीत उडविल्या जाणा-या फटाक्यामुळे पुणे शहरात आगीच्या २५ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:02 AM2017-10-22T02:02:30+5:302017-10-22T02:02:33+5:30

दिवाळीत उडविल्या जाणा-या फटाक्यामुळे आगी लागण्याच्या घटना यंदाही घडल्या असून तीन दिवसांत शहरात आगीच्या २५ घटना घडल्या. सुदैवाने त्या किरकोळ स्वरुपाच्या होत्या.

25 fire incidents in Pune city due to fire crackers in Diwali | दिवाळीत उडविल्या जाणा-या फटाक्यामुळे पुणे शहरात आगीच्या २५ घटना

दिवाळीत उडविल्या जाणा-या फटाक्यामुळे पुणे शहरात आगीच्या २५ घटना

Next

पुणे : दिवाळीत उडविल्या जाणा-या फटाक्यामुळे आगी लागण्याच्या घटना यंदाही घडल्या असून तीन दिवसांत शहरात आगीच्या २५ घटना घडल्या. सुदैवाने त्या किरकोळ स्वरुपाच्या होत्या.
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी केली जाते़ गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या चार तासांत आगीच्या १५ घटना घडल्या होत्या़ त्यात काही झाडांना, कचराकुंड्यांना आगी लागल्या होत्या़ शहराच्या बाणेर, बिबवेवाडी, कात्रज, खराडी, पाषाण, कोथरूड, हडपसर यांसह अनेक ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या़ पाडव्याच्या दिवशी शहरात एकूण ७ आगीच्या घटना घडल्या़ बुधवार पेठेतील चोळखण आळीमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास एका कापड गोदामाला आग लागली होती़ पासोड्या विठोबा चौकात रहेजा हँडलूम हे कापडाचे दुकान तळमजल्यावर असून त्याचे गोदाम तिसºया मजल्यावर आहे़ दिवाळीनिमित्त गोदामामध्ये कापडाचा स्टॉक ठेवण्यात आला होता़ या आगीमध्ये सर्व माल जळून खाक झाला़ अग्निशमन दलाच्या पाच वाहनांच्या मदतीने २ तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले़ या आगीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर कोंडला होता़
शनिवारी शहरात रात्रीपर्यंत गुरुवार पेठ, येरवडा येथे आगीच्या तीन किरकोळ घटना घडल्या़ फटाक्याने कचरा पेटीतील कचरा पेटल्याने आग लागली होती़
अग्निशमन दलाने आपल्या सर्व कर्मचाºयांच्या रजा रद्द करून सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवली होती़ आगीसंबंधी कॉल येताच गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यावर नियंत्रण मिळविण्यात येत होते़

Web Title: 25 fire incidents in Pune city due to fire crackers in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.