शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २४ हजार शेतकरी ‘आधार’ पासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 22:30 IST

आधी बँक खाते आधार लिंक करा; नंतरच कर्ज माफीसाठी पात्र ठरला..

ठळक मुद्देआधार लिंकसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना पत्रसर्व शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक

पुणे : राज्य शासनाच्या शेतकरी कर्ज माफीसाठी पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील अद्यापही तब्बल २४ हजार पेक्षा अधिक शेतकचे बँक खाते आधार लिंक नसल्याचे समोर आले आहे. या सर्व शेतक-यांना आधी बँक खाते आधार लिंक करा , त्यानंतरच शेतक-यांना कर्ज माफीसाठीचा अर्ज भरता येणार आहे. यामुळे शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची बँक खाती आधार लिंक करण्यासाठी  सहकार्य करण्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व संबंधित बँकांना दिले आहे.     राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाशिव आघाडी सरकारने शेतक-यांसाठी ‘महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना’ जाहिर केली आहे. शासनाने शेतक-यांना कर्ज माफी जाहिर करताना अनेक अटी घातल्या आहेत. यामध्ये सर्वांत महत्वाची अट कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना आपले बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला केवळ २ लाख रुपयापर्यंत कर्ज माफी देण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ९२ हजार १३४ शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी २ लाख प्रमाणे कर्जमाफी देण्यासाठी १ हजार ८४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. परंतु यासाठी सर्व शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे बंधनकारक आहे. शेतक-यांचे बँक खाती आधार लिंक करण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि बँक प्रतिनिधीची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीमध्ये बँकांनी  खास शिबिरांचे आयोजन करुन लवकरात लवकर शिल्लक राहिलेल्या शेतक-यांची बँक खाते आधार लिंक करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीAdhar Cardआधार कार्डState Governmentराज्य सरकार