पुणे : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू केली असताना शहरात विविध ठिकाणी मद्य विक्री करणार्या २३ जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अमली पदार्थ विक्री करणार्या दोघांना अटक करुन ३ लाख ६० हजार ५९० रुपयांचा गांजा, चरस व इतर माल जप्त केला आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहे. असे असताना अनेक ठिकाणी चोरुन अवैद्यरित्या दारु विक्री केली जात असल्याचे आढळून आले. अनेक नागरिक त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन त्याची माहिती देत होते. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन मद्य विक्री करणार्यांवर छापे टाकले.हडपसर, बिबवेवाडी, सिंहगड रोड, कोंढवा, फरासखाना, मुंढवा, विमानतळ,सहकारनगर, लष्कर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली असून त्यात २२ गुन्हे दाखल करण्यात येऊन २३ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये ४९ हजार रुपयांचे मद्य व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.अमली पदार्थांची विक्री करणार्यांवर दोन गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून ७ हजार रुपयांचा गांजा व ३ लाख ६० हजार ५९० रुपयांचा चरस व इतर माल जप्त केला आहे
पुणे शहरात लॉकडाऊनमध्ये मद्य विक्री करणार्या २३ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 18:42 IST
गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन मद्य विक्री करणार्यांवर छापे टाकले.
पुणे शहरात लॉकडाऊनमध्ये मद्य विक्री करणार्या २३ जणांना अटक
ठळक मुद्दे३ लाख ६० हजार ५९० रुपयांचा गांजा, चरस व इतर माल जप्त