शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अबब...! कोरोना संकटातही राज्यात 23 लाख दस्त नोंदणी; शासनाला सुमारे 34 हजार कोटींचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 20:55 IST

कोरोनाचे संकट असतानाही राज्यात बांधकाम क्षेत्रात प्रचंड तेजी असल्याचे दस्त नोंदणीवरून स्पष्ट

पुणे : कोरोनाचे संकट असतानाही राज्यात बांधकाम क्षेत्रात प्रचंड तेजी असल्याचे दस्त नोंदणीवरून स्पष्ट झाले. सन 2021-22 या आर्थिक वर्षांत राज्यात तब्बल 23 लाख 70 हजार 408 दस्तांची नोंदणी झाली. यामधून शासनाला सुमारे 34000 कोटींचा महसूल मिळाला आहे.

कोरोना व लाॅकडाऊनमुळे राज्यातील दस्त नोंदणी काही महिने पूर्णपणे ठप्प झाली होती. याचा शासनाच्या महसुलावर प्रचंड मोठा परिणाम झाला. यामुळेच कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात तीन टक्क्यांची सवलत जाहीर केली. याचा चांगला परिणाम झाला व मंदीमध्ये असलेल्या बांधकाम क्षेत्राला चांगली उभारी मिळाली. गेल्या दोन वर्षांपासून राज्याच्या दस्त नोंदणीत भरघोस वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी होऊन 29 हजार कोटींचा महसूल शासनाला मिळाला होता. त्यावेळी कमी मुल्य असलेल्या व बक्षीस पत्रासारख्या व्यवहारामध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळेच दस्तांची संख्या अधिक असताना तुलनेत महसूल कमी होता. परंतु यंदा मोठ्या किमतीच्या,  सर्वाधिक मुल्य असलेल्या दस्तांची संख्या वाढली असून, 23 लाख 70 हजार 408 दस्तांची गुरुवार (दि.31) मार्च पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी झाली होती. यामधून शासनाला सुमारे  34 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी सांगितला.

टॅग्स :PuneपुणेMONEYपैसाState Governmentराज्य सरकार