शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी २३ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:19+5:302021-02-05T05:08:19+5:30

नारायणगाव : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांचा ...

23 crore sanctioned for conservation of Shivneri fort | शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी २३ कोटींचा निधी मंजूर

शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी २३ कोटींचा निधी मंजूर

नारायणगाव : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांचा निधीला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.

निधी जाहीर करताना ठाकरे म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधीत गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभीकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार असून यासाठी २३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. या निधीतून शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व जपत त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल, भविष्यात शिवनेरीप्रमाणेच राज्यातील सर्व गडकिल्ल्यांचा त्यांचे ऐतिहासिक महत्व राखत पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल. या माध्यमातून शिवरायांचे कार्य देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागामार्फत व्यापक कार्य केले जाईल, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले.

आमदार बेनके म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकासासाठी ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे . या निधीतून पुरातत्व विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे केली जाणार आहेत. या कामासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या कामाच्या मंजुरीसाठी बैठका घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तसेच पर्यटन मंत्री ठाकरे यांचे आ. बेनके यांनी आभार मानले.

शिवनेरीवर करण्यात येणारी कामे....

अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनुरुज्जीवन, पाथवेंची सुधारणा, रॉककट गुंफांचे पुनुरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा आदी विविध रस्त्यांची सुधारणा करणे, शिवसंकुल येथे इको टुरीजमची कामे, अप्पर पाथवेसाठी गॅबियन वॉल, बागेसाठी लँडस्केपिंगची कामे आदी विविध कामांचा समावेश आहे.

Web Title: 23 crore sanctioned for conservation of Shivneri fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.