पुणे : शहरात मंगळवारी २२४ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २४१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ६६० संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ८़ ४२ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहापर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २१६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३०० इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ६६१ इतकी आहेत़ आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६८६ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ६४ हजार २०९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८१ हजार ८७५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७४ हजार ५२८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================