Pune Crime: वडिलांनी पैसे पाठवायला सांगितले आहे असे सांगत २२ वर्षीय तरुणीला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 11:20 AM2024-04-20T11:20:39+5:302024-04-20T11:20:52+5:30

याप्रकरणी कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....

22-year-old girl accused of saying that her father has asked her to send money | Pune Crime: वडिलांनी पैसे पाठवायला सांगितले आहे असे सांगत २२ वर्षीय तरुणीला गंडा

Pune Crime: वडिलांनी पैसे पाठवायला सांगितले आहे असे सांगत २२ वर्षीय तरुणीला गंडा

पुणे : वडिलांचे नाव घेऊन पैसे पाठविल्याचे खोटे मेसेज पाठवून सायबर चोरट्यांनी एका तरुणीची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार हा प्रकार १८ जानेवारी रोजी घडला आहे. तक्रारदार तरुणीला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. खोटी ओळख सांगून सायबर चोरट्यांनी तिच्या वडिलांचे नाव घेत पैसे पाठवायला सांगितले. तरुणीचा विश्वास बसल्याने सायबर चोरट्यांनी सांगितल्याप्रमाणे १८ हजार रुपये पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांकाविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.

Web Title: 22-year-old girl accused of saying that her father has asked her to send money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.