सारथी संस्थेचे २१ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:12 AM2021-09-26T04:12:12+5:302021-09-26T04:12:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सारथी संस्थेच्या वतीने मराठा व कुणबी गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेच्या ...

21 students of Sarathi Sanstha succeed in UPSC examination | सारथी संस्थेचे २१ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी

सारथी संस्थेचे २१ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सारथी संस्थेच्या वतीने मराठा व कुणबी गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेच्या तयारीसाठी विद्यावेतन देऊन दिल्ली व पुण्यातील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. लाॅकडाऊनमध्ये मुलाखतीच्या तयारीसाठी ऑनलाईन मार्गदर्शन देण्यात आले. याचाच परिणाम म्हणून सारथीचे २१ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले.

देशात नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. या परीक्षेत सारथी पुणेमार्फत प्रायोजित युपीएससी प्रशिक्षण उपक्रमातील २१ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. विनायक नरवाडे यांचा गुणवत्ता यादीत ३७ वा क्रमांक आहे. यशस्वी २१ विद्यार्थ्यांमध्ये ४ विद्यार्थिनींचा समावेश असल्याचे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सांगितले.

चौकट

हे आहेत ‘सारथी’चे यशवंत

विनायक कारभारी नरवाडे (१८२), गौरव रवींद्र साळुंखे (१८३), प्रतीक अशोक धुमाळ (२३६), प्रथमेश अरविंद राजशिर्के (३२५), आनंद अशोक पाटील (३५२), सागर भारत मिसाळ (३५३), सूरज भाऊसाहेब गुंजाळ (३६१), अनिल रामदास मस्के (३८३), अर्पिता अशोक ठुबे, (४०२), अमोल सुरेशराव मुरकुट (४२६), अनिकेत अशोक फडतरे (४३२), राकेश महादेव अकोलकर (४५५), ओंकार मधुकर पवार (४६६), नितीन गंगाधर पुके, (४७६), प्रणव विनोद ठाकरे (५१३), रणजित मोहन यादव (५६१), माधुरी भानुदास गरुड (५७७), पूजा अशोक कदम (६१४), हर्षल भगवान घोगरे (६३३), रविराज हरिश्चंद्र वडक (६४१) आणि सायली अशोक गायकवाड.

Web Title: 21 students of Sarathi Sanstha succeed in UPSC examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.