शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २१ जणांना अटक व सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 21:05 IST

बनावट दस्तऐवज व खोट्या तारणाच्या आधारे बनावट व्यक्तींना कर्ज देताना त्यांचे कर्तव्य व जबाबदरा-यांचा पालन न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

ठळक मुद्देकर्जदाराची कर्जपरतफेड करण्याची क्षमता देखील तपासली नाही.बनावट कागदपत्रांच्या आधारे अस्थित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावे वाहन खरेदीच्या नावाखाली प्रत्येकी १८ लाख असे एकूण ८४ लाख रुपयांचे कर्ज

पुणे : वाहन कर्जात ५४ लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी राजगुरुनगर सहकारी बँक लि.चे तत्कालीन शाखा व्यवस्थापक, कर्ज विभाग प्रमुख आणि संचालकांसह २१ जणांना विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अप्पर विशेष लेखापरीक्षक विजय पालखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बँकेच्या कर्मचा-यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयात हजर केला असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. ए. दरवेशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक अशोक मोतीलाल ओसवाल, मुख्य शाखेतील कर्ज विभागाचे प्रमुख अशोक कोंडजी गावडे, संचालक दिपक पोपट वारुळे आदींना अटक करण्यात आली. बनावट दस्तऐवज व खोट्या तारणाच्या आधारे बनावट व्यक्तींना कर्ज देताना त्यांचे कर्तव्य व जबाबदरा-यांचा पालन न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.     याबाबात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर बँकेच्या बुधवार पेठ येथील शाखेतून राहूल श्रीकांत गोसावी (रा. बुधवार पेठ) विनय रमेश गोसावी (रा. शुक्रवार पेठ) आणि प्रज्ञा विवेक ठोंबरे (रा. धायरी) यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अस्थित्वात नसलेल्या व्यक्तींच्या नावे वाहन खरेदीच्या नावाखाली प्रत्येकी १८ लाख असे एकूण ८४ लाख रुपयांचे कर्ज काढले. मात्र वाहन त्यांनी पैशाचा अपहार केला. २००८ ते २०११ दरम्यान हा सर्व प्रकार घडला. कर्ज देताना बँकेचे शाखा व्यवस्थापक, कर्ज विभागाचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधत कर्जाच्या प्रकरणाची तडताळी करणे आवश्यक होते. तसेच कर्जदाराची कर्जपरतफेड करण्याची क्षमता देखील तपासली नाही. बनावट व्यक्तींना सभासद करून कर्ज दिले. या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी लेखापरिक्षक पालखे यांच्याकडे देण्यात आली होती. ..............राहूल गोसावी, विनय गोसावी आणि प्रज्ञा ठोंबरे यांना बेकायदेशीर पद्धतीने कर्ज देण्यात आल्याचे निर्दशनात आल्याने त्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान याप्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ भिकुशेठ लोंबर यांना अटकपुर्व जामीन मिळाला होता. त्यांच्यावतीने अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :PuneपुणेbankबँकfraudधोकेबाजीCrimeगुन्हाPoliceपोलिसCourtन्यायालय