शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Railway| हडपसर टर्मिनलसाठी २१ कोटी, तर पुणे स्थानकासाठी ३१ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:04 IST

यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याला रेल्वेसाठी जवळपास ११ हजार ९०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे...

पुणे : हडपसर रेल्वे टर्मिनलसाठी २१ कोटी, तर पुणे स्थानकावरील यार्ड रिमोल्डिंग व फलाटाच्या विस्तारीकरणासाठी जवळपास ३१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. बहुचर्चित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड कॉरिडॉरसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १ हजार रुपये मंजूर झाले आहे. यासह पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी सर्वाधिक म्हणजे जवळपास १५६६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच बारामती-लोणंदसाठी देखील १ हजार रुपये देऊन हेड खुले करण्यात आले आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याला रेल्वेसाठी जवळपास ११ हजार ९०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिला गेला आहे. पुण्यासाठी हा अर्थसंकल्प चांगला ठरला आहे. पुणे-मिरज-लोढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी व विद्युतीकरणासाठी कॅपिटल व ईबीआर असे मिळून जवळपास १५६६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे दुहेरीकरणाच्या कामाला गती येईल.हडपसर टर्मिनलचा विकासपुणे स्थानकावर होणाऱ्या गाड्यांच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी हडपसर टर्मिनल उभे केले जात आहे. तीन फलाटांच्या विकासासह २ नवे स्टेबलिंग लाईन तयार केली जाणार आहे. तसेच नवे आरआरआय केबिन तयार करण्याचे नियोजन आहे. या २१ कोटींत हडपसर स्थानकाचा कायापालट होणार आहे.पुणे स्थानकाचे यार्ड रिमोल्डिंग होणारपुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमोल्डिंग व फलाटाच्या विस्तारीकरणासाठी जवळपास ३१ कोटी रुपये मंजूर झाले आहे. यात पुणे स्थानकावरील दोन, तीन व सहा या क्रमांकांचे फलाट २४ डबे बसतील इतक्या लांबीचे होतील. त्यामुळे आता गाड्यांना होम सिग्नलवर थांबावे लागणार नाही.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेMaharashtraमहाराष्ट्रIndian Railwayभारतीय रेल्वे