शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

२१ सेंटर्स, १५ एजंट आणि २,७०० बनावट प्रमाणपत्रे, उच्चशिक्षित सय्यद इम्रानचे मोठे कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 05:54 IST

लॅपटॉपच्या तपासात आतापर्यंत २ हजार ७०० हून अधिक बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाले. 

पुणे : एमबीएचा विद्यार्थी असलेल्या सय्यद इम्रान सय्यद इब्राहीम याने बनावट वेबसाईट तयार करून दहावी, बारावी ते थेट पदवीपर्यंतची  बनावट प्रमाणपत्र देण्यासाठी १५ एजंटांची नेमणूक केली होती. त्यासाठी २१ ठिकाणी सेंटर्स सुरू केली होती. त्याच्या लॅपटॉपच्या तपासात आतापर्यंत २ हजार ७०० हून अधिक बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाले. 

संदीप कांबळे (रा. सांगली), कृष्णा गिरी (रा. बिडकीन, संभाजीनगर), अल्ताफ शेख (रा. परांडा, जि. धाराशिव), सय्यद सय्यद इब्राहीम (रा. संभाजीनगर) यांना अटक केली आहे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, सय्यद हा त्यांचा सूत्रधार आहे. यू-ट्यूबवर पाहून त्याने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल आणि ए-१ हिंद युनिव्हर्सिटी अशा नावाने दोन फेक वेबसाईट बनविल्या. ओपन स्कूलच्या नावाने तो १० वी, १२ वीचे प्रमाणपत्र देत असे, तर पदवी व इतर प्रमाणपत्रे ए-१ हिंद युनिव्हर्सिटीच्या नावाने देत असे.

दुसरा मोठा घोटाळा

पुणेपोलिसांनी दोन वर्षांपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा उघडकीस आणला होता. त्यात बनावट प्रमाणपत्र मिळविलेल्या ७ हजार ८०० जणांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हा आणखी एक मोठा घोटाळा पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसfraudधोकेबाजी