शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिरुर तालुक्यातील निमोणेत २१ बोटींना जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 12:42 IST

वाळूमाफियांचे १ कोटी १० लाखांचे नुकसान

ठळक मुद्देशिरूर व श्रीगोंदा महसूल विभागाची संयुक्त कारवाई : पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने वाळूमाफियांनी उघडपणे सुरू केली तस्करी

शिरूर/निमोणे : पिंपळाचीवाडी व दाणेवाडी परिसरात घोड नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्या तब्बल २१ बोटी फोडल्या. शिरूर व श्रीगोंदा महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत वाळूमाफियांचे तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.निमोणे (ता. शिरूर) नजीक पिंपळाचीवाडी तसेच दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) हद्दीतील घोड नदीच्या पात्रामध्ये गेली काही दिवसांपासून वाळूमाफियांनी अवैधपणे वाळूउपसा आणि वाहतुकीचा सपाटा लावला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या कामांमध्ये महसूल तसेच पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने वाळूमाफियांनी शासकीय यंत्रणांना आव्हान देत उघडपणे तस्करी सुरू केली होती. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून कोट्यवधी रुपयांची लूट चालू होती. नदीपात्राचे लचके तोडत, अवजड वाहनांच्या साहाय्याने वाहतूक करताना रस्त्याचीही माफियांनी वाट लावली होती. शिरूरच्या तहसीलदार एल. डी. शेख, बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माने, शिरूरचे मंडलाधिकारी नीलेश घोडके, तलाठी सुशीला गायकवाड, ललिता वाघमारे,  पो. नि. अरविंद माने, पो.स.ई. बोराडे, पो.ना. नंदकुमार पठारे, पो.शि. दादासाहेब क्षीरसागर, पो. शि. संपत गुंड, पो. शि. विकास कारखिले, पो.शि. चालक म्हस्के, संजय सातव, पोलीस उपअधीक्षक, कर्जत उपविभाग यांनी ही कारवाई  केली.............शिरूरचे यापूर्वीचे तहसीलदार भोसले यांनी वेळोवेळी कारवाई करत वाळूमाफियांना जेरीस आणले होते. मात्र, भोसले यांची बदली होताच वाळूचोरांनी डोके वर काढले होते. निवडणुकीच्या कामातून उसंत मिळताच परिसरातील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत मंगळवारी (दि. १२) सुट्टीचा दिवस असूनही शिरूरच्या तहसीलदार एल. डी. शेख यांच्या पथकाने वाळूउपसा करणाºया बोटीवर धडक ‘हल्लाबोल’ करत तब्बल २१ बोटी जाळून नष्ट केल्या. यामध्ये वाळूचोरांचे तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचे नुकसान झाले. या धडक कारवाईने वाळूमाफियांना चांगला ‘दणका’ दिला आहे. 

टॅग्स :ShirurशिरुरsandवाळूPoliceपोलिसRevenue Departmentमहसूल विभाग