शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

2014 मध्ये भोसरीसह खेड, शिरूरमध्ये आढळरावांना होते मताधिक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 00:53 IST

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवत हॅट्ट्रीक केली होती. राष्टवादीचे देवदत्त निकम यांचा त्यांनी तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला.

- निनाद देशमुखपुणे  -  शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवत हॅट्ट्रीक केली होती. राष्टवादीचे देवदत्त निकम यांचा त्यांनी तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला. त्यांना भोसरी, खेड आळंदी, हडपसर, शिरूर विधानसभा संघातून मोठी आघाडी मिळाली. मात्र, त्यांच्या घरच्या आंबेगाव मतदार संघातून कमी मते मिळाली. पाच विधानसभा मतदारसंघात आणि जिल्हा परिषद गटांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असतांनाही देवदत्त निकम यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना ६ लाख ४३ हजार ४१५ मते मिळाली. देवदत्त निकम यांना ३ लाख ४१ हजार ६०१ मते मिळाली. मनसेचे उमेदवार अशोक खांडेभराड हे ३६ हजार मते घेऊन तिसऱ्या स्थानावर राहिले.दोन्ही उमेदवारांना आंबेगाव तालुक्यातून जवळास समान मते २०१४ मध्ये दोन्ही उमेदवार आंबेगावचे असतानाही आढळराव यांना ९८ हजार १७७ मते तर देवदत्त निकम यांना ८९ हजार ५९४ मते मिळाली होती. इतर विधानसभा मतदारसंघापेक्षा कमी मताधिक्य आढळराव यांना मिळाले.जुन्नरमधील शिवसेनेचा प्रभाव ठरला निर्णायकजुन्नर तालुक्याने तीन निवडणुकांमध्ये आढळराव पाटलांना कायम मताधिक्य दिले आहे. गेल्या निवडणुकीत पाटील यांना ९७ हजार ३०९ एवढी मते मिळाली. निकम यांना ७१ हजार ७६५ मते मिळाली होती.राष्ट्रवादीचा प्रभाव काढला मोडीतगेल्या तीनही निवडणुकांमध्ये खेड तालुक्याने आढळराव पाटील यांना मताधिक्य दिले आहे. २०१४ ला आढळराव पाटील यांना १ लाख ११ हजार ५३६ तर निकम यांना ४९ हजार ८७५ मते मिळाली. आढळरावांच्या तुलनेत निकम यांना निम्म्याहून कमी मते पडली. निवडणुकीचा निकाल फिरविण्याची ताकद या मतदारसंघात आहे.शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्यावर्चस्वला शिवसेनेचा दे धक्का!शिरूर तालुक्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. तरीही या तालुक्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिन्ही निवडणुकीत मोठे मताधिक्य आहे. आढळराव यांना १ लाख ९ हजार ४७१ मते मिळाली तर निकम यांना केवळ ५४ हजार १७१ मते मिळाली.प्रभावी जनसंपर्क नसतानाहीहडपसरमधून सर्वाधिक मताधिक्यशिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला हडपसर मतदारसंघात पिछाडीवर टाकत या मतदारसंघातून जवळपास लाखाच्या वर मते मिळवली. आढळराव पाटील यांना १ लाख ७ हजार ३२५ व निकम यांना ५१ हजार ५७१ मते मिळाली. येथे देखील त्यांनी ५५ हजार ७५४ मते अधिक मिळविली.शिवाजीराव पाटील हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. राष्टÑवादी कॉँग्रेसची या मतदारसंघात ताकद असताना आत्तापर्यंत त्यांना विजय मिळविता आलेला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत. आंबेगाव वगळता पाचही मतदारसंघात शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष युतीचे आमदार आहेत. जुन्नरमधून महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.भोसरीमध्ये निवडणुकीनंतर भाजपावासी झालेले महेश लांडगे, हडपसरमध्ये भाजपाचे योगेश टिळेकर, हडपसरमध्ये भाजपाचे बाबुराव पाचर्णे आणि खेड-आळंदीमध्ये शिवसेनेचे सुरेश गोरे आमदार आहेत. आंबेगाव या एकमेव मतदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील हे आमदार आहेत. लोकसभेच्या निकालावर विधानसभेची गणिते ठरणार असल्याने सर्वच तालुक्यांतील दोन्ही पक्षांच्या दिग्गजांची कसोटी लागणार आहेत.

टॅग्स :ShirurशिरुरShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक