शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वसतीगृहामधील २०० क्वारंटाईन नागरिकांचा जेवण वेळेत न मिळाल्यामुळे संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 23:46 IST

मागील दोन दिवसांपासून येथे क्वॉरंटाईन करुन ठेवलेल्या नागरिकांचे हाल सुरु

ठळक मुद्देमंगळवारी रात्रीचे जेवण मध्यरात्री बाराच्या सुमारास पोचविण्यात आले.

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखी अधिकच वाढत चालली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात येत आहे. वडगाव येथील सिंहगड इन्सिट्युटच्या पन्हाळा वसतीगृहामध्ये जवळपास 200 लोकांना क्वॉरंटाईन करुन ठेवण्यात आले असून या नागरिकांना जेवण वेळेत मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.वसतीगृहामध्ये शहराच्या विविध भागामधून जवळपास 200 नागरिकांना क्वॉरंटाईन करुन ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये अगदी एक वर्षाच्या मुलापासून ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. मागील दोन दिवसांपासून येथे ठेवलेल्या नागरिकांचे हाल सुरु आहेत. या नागरिकांना सकाळचा चहा आणि न्याहरी दुपारी एक वाजता मिळाली. तर, मंगळवारी रात्रीचे जेवण मध्यरात्री बाराच्या सुमारास पोचविण्यात आले. पालिकेने या विलगीकरण कक्षाची जबाबदारी स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य अधिकाºयांकडे सोपविलेली आहे. परंतू, पालिकेचा उदासिन आणि असंवेदनशील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.याठिकाणी विलगीकरण करुन ठेवण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या महिलांची आहे. या नागरिकांना खिचडी भात पुरवला जात आहे. त्यानेही भूक भागेल याची शाश्वती देता येत नाही. नागरिकांना जिन्यामध्ये आणि मोकळ्या व्हरांड्यात रांगेत उभे करुन वसतीगृहाच्या बाहेर बोलावून खिचडी वाटप केले जात आहे. या वाटपावेळी सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळले जात नाहीत. अधिकारी इमारतीच्या गेटच्या बाहेर उभे राहून कर्मचाºयांना सूचना देऊन बाहेरुनच निघून जातात. ना नागरिकांशी कोणता संवाद साधला जात आहे ना कोणती काळजी घेतली जात आहे. कोंबड्या-बकºया कोंबाव्यात तशी माणसे याठिकाणी कोंबण्यात आली आहेत. याकडे पालिकेच्या क्षेत्रीय अधिका-यांपासून वैद्यकीय अधिका-यांचेही दुर्लक्ष होत आहे.======मंगळवारी दिवसभरात येथे ठेवलेल्या नागरिकांना जेवणच देण्यात आले नव्हते. रात्री उशिरापर्यंत जेवण मिळालेले नव्हते. रात्री साडेअकरा वाजता नागरिकांनी पालिकेच्या काही वरिष्ठ अधिका-यांना संपर्क साधला. त्यानंतर, सूत्रं हलल्यावर मध्यरात्री बाराच्या सुमारास सर्वांना तांदळाची खिचडी पाठविण्यात आला. तोपर्यंत नागरिक भुकेने व्याकूळ झाले होते.======आम्हाला दोन दिवसांपासून येथे आणून ठेवले आहे. माज्या कुटुंबातील एकूण अकरा जण आहेत. यासोबतच जवळपास 200 नागरिक याठिकाणी आहेत. त्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. परंतू, प्रशासन अत्यंत निर्दयीपणे वागत आहे. जनावरांना द्यावी तशी वागणूक आम्हाला दिली जात आहे. सकाळचा चहा नाश्ता दुपारी देतात, दुपारचं जेवण संध्याकाळी आणि मध्यरात्री दिलं जातं. मोठी माणसं कसेबसे भुकेवर नियंत्रण ठेवतील परंतू लहान मुलांचे काय? त्यांनी काय खायचे? फार असंवेदनशील कारभार सुरु आहे.- रविंद्र मोरे, गुलटेकडी......

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfoodअन्न