जवानांसाठी पुणेकरांकडून २०० किलो तिळगूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:37+5:302021-01-08T04:27:37+5:30

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुप्ते मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन ...

200 kg of sesame seeds from Pune | जवानांसाठी पुणेकरांकडून २०० किलो तिळगूळ

जवानांसाठी पुणेकरांकडून २०० किलो तिळगूळ

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुप्ते मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. नंदू फडके, वीरमाता ऊर्मिला मिजार, मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

लायन्स क्लब ऑफ विजयनगर, लायन्स क्लब ऑफ सहकारनगर, करिश्मा ज्येष्ठ नागरिक संघ, एलआयसी शिवाजीनगर व कोथरूड, साम्राज्य ज्येष्ठ नागरिक मंच, पोटसुळ्या मारुती मंडळ, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, काळभैरवनाथ तरुण मंडळ, सेवा मित्र मंडळ, कलातीर्थ, गरुड गणपती मंडळ आदी या उपक्रमात सहभागी झाले. शाहीर हेमंत मावळे, योगिनी पाळंदे, राजश्री शेठ, नीला कदम, कल्याणी सराफ, उमेश सकपाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: 200 kg of sesame seeds from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.