शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ दाखवून ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षे सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 12:07 IST

ही घटना ७ जानेवारी २०१८ रोजी घडली होती...

पुणे : मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ दाखवून ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी हा निकाल दिला. पवन राज कुडाळकर (वय २४) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. डीएनए चाचणीचा सकारात्मक अहवाल आणि पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.

ही घटना ७ जानेवारी २०१८ रोजी घडली होती. पीडितेच्या आईने जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पीडित लहान मुलाबरोबर खेळत होती. त्यावेळी कुडाळकर याने मुलाला १० रुपये देऊन खाऊ आणण्यास पाठविले. पीडित मुलीला घरात घेऊन गेला आणि तिला व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अरुंधती रासकर यांनी १३ साक्षीदार तपासले. त्यात या पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. कुडाळकर याला बलात्कार केल्याबद्दल २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड, तर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ६नुसार ३ वर्षे तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी