चासकमान धरणसाठ्यात २० टक्क्यांनी वाढ
By Admin | Updated: July 4, 2017 03:29 IST2017-07-04T03:29:20+5:302017-07-04T03:29:20+5:30
खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात

चासकमान धरणसाठ्यात २० टक्क्यांनी वाढ
चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात २० टक्क्याने वाढ झाली आहे.
खेड तालुक्याच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांवर विशेषत: भीमाशंकर अभयारण्य परिसरात मागील आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली.
यामुळे भीमा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. चासकमान धरणाच्या जलाशयात उन्हाळ्याच्या अखेरीस ५.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तसेच पाणीपातळी ६३०.५३ होती तर एकूण साठा ३९.१० दलघमी होता. उपयुक्त पाणीसाठा ११.९१ दलघमी होता.
परंतु सध्या भीमाशंकर, खरोशी, मंदोशी, शिरगाव, भोरगिरी, धामणगाव, आव्हाट, वाळद, डेहेणे, वाडा, सह धरण परिसरात पावसाच्या दमदार हजेरीमुळे धरण परिसरात २६९ मिली मीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे चासकमान धरणाच्या पाणीसाठ्याात तब्बल २० टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या पाणीपातळी ६३७.२६ आहे.
एकूण साठा ८२.७६ दलघमी तर उपयुक्त साठा ५५.५७ दलघमी तसेच पाणी टक्केवारी २५.९० टक्के इतकी आहे. चासकमान धरण परिसरात पाऊस असाच सुरू राहिल्यास खेडसह शिरूर तालुक्याची पाणी समस्या दूर होणार आहे. या परिसरात आणखी दमदार पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी निश्चित वाढेल.