शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: विनाझाकणाच्या टाकीत पडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 10:24 IST

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे...

पुणे : बांधकाम साइटवर बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना लोणी काळभोर येथील रायवाडी रोडवरील गणेश खेडेकर यांच्या बांधकाम साइटवर ६ एप्रिल रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

प्रिन्स चंद्रकुमार कोशले (२) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी बापू शिवराम माने (४४, रा. साठेवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) याच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार विजय नथू जाधव यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायवाडी रोडवर गणेश खेडेकर यांचे बांधकाम सुरू आहे. आरोपी बापू माने हा बांधकाम साइटवर ठेकेदार म्हणून काम करतो. माने याने घराच्या कन्स्ट्रक्शन साइटवर काम करताना दुर्लक्ष करून निष्काळजीपणे अंडरग्राउंड पाण्याची टाकी बांधली. मात्र, पाण्याच्या टाकीवर झाकण टाकले नाही. मृत प्रिन्स खेळत असताना झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडला. टाकीत असलेल्या पाण्यात बुडून प्रिन्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तरटे करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी