मेट्रोच्या खर्चात २ हजार कोटींची वाढ

By Admin | Updated: November 5, 2015 02:23 IST2015-11-05T02:23:12+5:302015-11-05T02:23:12+5:30

मेट्रोची मंजुरी अंतिम टप्प्यात असताना जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोमध्ये बदल करून ती भुयारी करावी, असा आग्रह काही राजकीय पदाधिकाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांनी धरल्यामुळे

2 thousand crores increase in Metro cost | मेट्रोच्या खर्चात २ हजार कोटींची वाढ

मेट्रोच्या खर्चात २ हजार कोटींची वाढ

पुणे : मेट्रोची मंजुरी अंतिम टप्प्यात असताना जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोमध्ये बदल करून ती भुयारी करावी, असा आग्रह काही राजकीय पदाधिकाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांनी धरल्यामुळे मेट्रोच्या खर्चात साधारपणे २ हजार कोटींची वाढ झाली आहे. नेत्यांच्या हेव्यादाव्यांचा भुर्दंड अखेर पुणेकरांना बसणार असून, मेट्रोच्या प्रस्तावित केलेल्या १७ रुपयांच्या तिकीटदरामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) २०१३मध्ये वनाज ते रामवाडी या मार्गासाठी २ हजार ५९३ कोटी रुपये, तर स्वारगेट ते चिंचवड या मार्गासाठी ५ हजार ३९१ कोटी रुपये खर्च होईल, असा एकूण ७ हजार ९८४ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. मात्र, हा प्रकल्प २०१३मध्ये पूर्ण होईल हे गृहीत धरून हा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता, आता या प्रकल्पाला दोन ते अडीच वर्षे उशीर झाल्यामुळे हा खर्च १० हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा खर्चासाठी प्रतिवर्ष ७ टक्के वाढ गृहीत धरल्यास तो १० हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. या वाढीव खर्चाचा सविस्तर सर्वंकष आराखडा येत्या १० दिवसांत महापालिकेकडून केंद्र शासनाला सादर केला जाईल.
डीएमआरसीने पहिल्या टप्प्याचा डीसीआर तयार केला तेव्हा वनाज ते रामवाडी याचा तिकीटदर १७ रुपये असेल, असे जाहीर केले केले होते. मात्र, आता वाढीव २ हजार कोटींचा खर्च होणार असल्याने या १७ रुपयांच्या तिकिटामध्ये मोठी वाढ होणार आहे. प्रकल्प खर्चसाठी राज्य शासन व केंद्र शासन प्रत्येकी २० टक्के रकमेचा भार उचलणार आहेत. तर, १० टक्के निधी महापालिका खर्च करेल. उर्वरित ५० टक्के निधी कर्जाच्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील मार्गावर १५ स्थानके व एक डेपो प्रस्तावित धरण्यात आला आहे. डेपो व स्थानकासाठी १८.४४ हेक्टर जागेची आवश्यकता लागणार आहे. वनाज ते रामवाडी व स्वारगेट ते चिंचवड या दोन मार्गांचा पहिला टप्पा ३१.५० किलोमीटरचा आहे. (प्रतिनिधी)

कंपनीला मान्यता मिळाल्यास कामाला गती
मेट्रोसाठी पुणे मेट्रो रेल कॉपोर्रेशन
या स्पेशल पर्पज व्हेईकल
कंपनीची स्थापना करण्याचा
प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविलेला आहे. त्याला मान्यता मिळून कंपनीचे प्रत्यक्षात काम
सुरू झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला गती मिळू शकेल. ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ किंवा ‘सार्वजनिक-खासगी सहभाग’ किंवा डीएमआरसी पॅटर्न यांपैकी कोणत्या पर्यायामधून मेट्रोची उभारणी करायची, याचा निर्णय कंपनीच्या संचालक मंडळाला घ्यावा लागेल.

पहिल्या मेट्रोचे सुधारित टप्पे
पहिला मार्ग ग् स्वारगेट ग् शिवाजी रस्ता ग् वाकडेवाडी ग् पुणे ग् मुंबई महामार्गाने चिंचवडपर्यंत. (एकूण लांबी १६.५९ किलोमीटर)

दुसरा मार्ग ग् वनाज कंपनी ग् कर्वे रस्ता ग् खंडूजीबाबा चौक ग् डेक्कन बसथांबा ग् मंगळवार पेठ ग् पुणे स्टेशन ग् बंडगार्डन ग् येरवडा ग् रामवाडीपर्यंत.

Web Title: 2 thousand crores increase in Metro cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.