Pune Corona Update: गुरुवारी शहरात २ हजार १४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 19:48 IST2022-02-03T18:51:27+5:302022-02-03T19:48:45+5:30
शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे

Pune Corona Update: गुरुवारी शहरात २ हजार १४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
पुणे : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. गुरुवारी शहरात १० हजार ५३६ चाचण्या पार पडल्या. त्यापैकी २ हजार १४१ रुग्ण कोरोनाबधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट २०.३२ टक्के झाला आहे.
शहरातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार २६ इतकी झाली असून, यापैकी केवळ ४.५८ टक्के बाधित हे रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व रूग्ण गृह विलगीकरणात आहेत. गुरुवारी ४ हजार १३६ जण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या विविध रूग्णालयात ५० रूग्ण इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर, २६ जण नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर तर २८८ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
शहरात आत्तापर्यंत ४३ लाख ६७ हजार ४५७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ६ लाख ४६ हजार ४८२ जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ६ लाख १५ हजार १८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार २७० जण दगावले आहेत.