फ्लेमिंगो प्रेमींकडून कुंभारगावला २ लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:38+5:302021-05-15T04:09:38+5:30
पुणे : फ्लेमिंगो या स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंभारगावाला (भिगवण) कोरोना रुग्णांना मदत म्हणून २ लाख रूपयांची मदत मिळाली. ...

फ्लेमिंगो प्रेमींकडून कुंभारगावला २ लाखाची मदत
पुणे : फ्लेमिंगो या स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंभारगावाला (भिगवण) कोरोना रुग्णांना मदत म्हणून २ लाख रूपयांची मदत मिळाली. फ्लेमिंगो प्रेमींनी या मदतीसाठी प्रयत्न केले. यातून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक वैद्यकीय उपकरणे दिली. आम्ही कटारियन्स या कटारिया हायस्कूलमधील सन १९८५च्या तुकडीने फ्लेमिंगोसाठी हे गाव आठवणीत ठेवले. या तुकडीचे संजीव फडतरे प्रसिद्ध पक्षी छायाचित्रकार आहेत. मित्रांसह ते या गावात फ्लेमिंगोंची छायाचित्र टिपण्यासाठी नेहमी जात असतात. कोरोना साथीत गावाचे काय या काळजीतून आम्ही कटारियन्सनी गावाला मदत करायचे ठरवले, असे संजीव फडतरे यांनी सांगितले. संजीव पाठारे, राजेश मेहता, सलील बर्वे, समीर देशमुख, राहुल पाठक, श्रीपाद लिमये यांनी पुढाकार घेतला. श्री विनायक औषध वितरकांनी साह्य केले. त्यातून ही मदत साकार झाली असे फडतरे म्हणाले.