रेल्वे स्थानक परिसरातून २ लाखांचे अमली पदार्थ हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:09 IST2021-06-23T04:09:23+5:302021-06-23T04:09:23+5:30
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अमली पदार्थविरोधी पथकाने पकडले. इरशाद इक्बाल सय्यद ...

रेल्वे स्थानक परिसरातून २ लाखांचे अमली पदार्थ हस्तगत
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अमली पदार्थविरोधी पथकाने पकडले.
इरशाद इक्बाल सय्यद (वय ४२, रा. जनतानगर, गवळीवाडा, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे.
साधू वासवानी रस्त्यावर अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी एक जण थांबला असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा लावून सय्यद याला पकडले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, मोबाईल संच असा २ लाख २८ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, प्रवीण शिर्के, मारुती पारधी, पांडुरंग पवार, संदीप जाधव, विशाल दळवी, राहुल जोशी यांनी ही कामगिरी केली.