शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Zilla Parishad Election: ३ पंचायत समितींच्या ३ गणांमध्ये २ ईव्हीएमचा वापर; उमेदवारांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 12:27 IST

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ३ हजार ६९३ मतदान यंत्रे तर ३६०५ कंट्रोल युनिट मतदान केंद्रावर वापरण्यात येणार आहेत. तर १४३ पैकी केवळ तीन गणांमध्ये २ मतदान यंत्रांची गरज भासणार आहे.

पुणे : जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांसाठी उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिटची संख्या अंतिम केली आहे. त्यानुसार आता ३ हजार ६९३ मतदान यंत्रे तर ३६०५ कंट्रोल युनिट मतदान केंद्रावर वापरण्यात येणार आहेत. तर १४३ पैकी केवळ तीन गणांमध्ये दोन मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीत मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिट बंद पडण्याच्या हजारांहून अधिक तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण १४ हजार ३३८ मतदान यंत्रांची उपलब्धता करून दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ही उपलब्धता आता दुपटीऐवजी चारपट केली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आता लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७३ गटांमध्ये २९९ उमेदवार आता रिंगणात उरले असून पंचायत समितीच्या १४३ गणांसाठी ५२८ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत पंचायत समितीसाठी ७२९ तर जिल्हा परिषदेसाठी ४२८ जणांनी माघार घेतल्याने आता मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिटची संख्याही अंतिम करण्यात आली आहे. त्यानुसार आता ३६०५ मतदान केंद्रांसाठी ३ हजार ६९३ मतदान यंत्रे लागणार आहेत. तर ३ हजार ६०५ कंट्रोल युनिट लागणार आहेत.

तर उमेदवारांची संख्या वाढल्याने बारामती, मुळशी आणि इंदापूर तालुक्यातील प्रत्येकी एका गणात दोन मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. त्यात मुळशी तालुक्यातील हिंजवडी गटातील माण गण, बारामती तालुक्यातील पणदरे गटातील पणदरे गण इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गटातील सणसर गणाचा समावेश आहे. त्यानुसार मुळशी तालुक्यात २२७ मतदान केंद्रांवर २६२ मतदान यंत्रे बसविली जाणार आहेत. बारामती तालुक्यातील २९९ मतदान केंद्रांवर ३२४ मतदान यंत्रे तर इंदापूर तालुक्यातील ४०० मतदान केंद्रांवर ४२८ मतदान यंत्रे बसविली जाणार आहेत. अन्य तालुक्यांत मतदान केंद्रांच्या संख्येइतकीच मतदान यंत्रे आणि कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आहेत.

नगरपरिषदा व महापालिकेच्या निवडणुकीत मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम व कंट्रोल युनिट बंद पडण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर अर्धा तास ते एक तास मतदान प्रक्रिया खोळंबली होती. यंत्रांची उपलब्धता कमी असल्याने मतदान यंत्रे बदलविण्यासाठी मोठा काळ गेला. त्याची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची उपलब्धता चारपटीने करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ३ हजार ६०५ मतदान केंद्रांवर १४ हजार ३३८ मतदान यंत्र व ५ हजार ८३३ कंट्रोल युनिट उपलब्ध असतील. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वाधिक ४०० मतदान केंद्र इंदापूर तालुक्यात असून यासाठी ४२८ मतदान यंत्र व ४०० कंट्रोल युनिट वापरण्यात येतील तर सर्वांत कमी १०५ मतदान केंद्र वेल्हा तालुक्यात असून तेथे प्रत्येकी १०५ मतदान यंत्र व कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

उमेदवारांची संख्या निश्चित झाली असून त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे मतदान यंत्रे व कंट्रोल युनिटची संख्या अंतिम झाली आहे तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदान केंद्रांच्या व उमेदवारांच्या संख्येनुसार चार पट उपलब्धता ठेवण्यात आली आहे. - नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक यंत्रे व्यवस्थापन कक्ष

English
हिंदी सारांश
Web Title : Increased Candidates Lead to Double EVMs in Zilla Parishad Election

Web Summary : With candidate numbers finalized, Pune administration will use extra EVMs in three constituencies. Over 14,000 EVMs are available due to past issues, quadrupling availability per Election Commission guidelines. Baramati, Mulshi, and Indapur will use two EVMs per booth in specific areas.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५EVM Machineईव्हीएम मशीनPoliticsराजकारणVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग