आला रे आला ! रत्नागिरी 'हापूस' आला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 07:44 PM2020-02-02T19:44:21+5:302020-02-02T19:50:43+5:30

मार्केट यार्डातील फळ विभागात यंदाच्या हंगामातील पहिली रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी दाखल झाली. यंदा वातावरणातील बदलामुळे गत वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन महिने उशीरा आंब्याचा हंगाम सुरु झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

1st Ratnagiri 'Hapus' alphonso mango arrived at Pune market yard for selling | आला रे आला ! रत्नागिरी 'हापूस' आला 

आला रे आला ! रत्नागिरी 'हापूस' आला 

googlenewsNext

पुणे : मार्केट यार्डातील फळ विभागात यंदाच्या हंगामातील पहिली रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी दाखल झाली. यंदा वातावरणातील बदलामुळे गत वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन महिने उशीरा आंब्याचा हंगाम सुरु झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान रविवार (दि.२) रोजी फळांचे व्यापारी अनिरुध्द ऊर्फ बाप्पू भोसले यांच्या गाळ्यावर  ही पेटी दाखल झाली. पाच डझनाच्या पेटीस घाऊक बाजारामध्ये तब्बल २१ हजार ५०० रुपये दर मिळाला.
दरवर्षी साधारण डिसेंबर-जानेवारी महिन्यात रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगाम सुरु होतो. परंतु यंदा दीड-दोन महिन्यांने उशीरा हंगाम सुरु झाला आहे. आगामी काळात देखील हापूस आंब्याची आवक साधारणच राहिल. रविवारी मार्केट यार्डामध्ये रत्नागिरी तालुक्यातील टेंभे गावातील शेतकरी सुभाष मनोहर खाडे यांच्या बागेतून हापूस आंब्याची आवक झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या हस्ते या पेटीचे पूजन केले. 

यावेळी अनिरूध्द भोसले, अनिकेत भोसले, ऋषिकेश भोसले, अजिंक्य कांचन, बलभीम माजलगावे, आडते असोसिएशनेचे उपाध्यक्ष युवराज काची, करण जाधव, प्रताप निकम, रामदास गायकवाड, भरत परदेशी, संजय वखारे, तात्या कोंडे, राजू ओसवाल, राजू पतंगे, आण्णा हराळे, कामगार युनियनचे अध्यक्ष विलास थोपटे, राजू सूर्यवंशी, तरकारी विभागाचे प्रमुख दत्तात्रय कळमकर, फळ विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे उपस्थित होते. रावसाहेब कुंजीर या आडत्याने लिलावात ही पेटी खरेदी केली. 
यंदाच्या हंगामाबाबत अनिरूध्द भोसले यांनी सांगितले की, यावर्षी थंडीच्या लहरीपणाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. नेहमीच्या तुलनेत उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे मे'पर्यंत आंब्याचे दर चढेच राहणार आहेत. रत्नागिरीसह कर्नाटक आंब्याची आवक वाढल्यानंतर मेमध्ये दरामध्ये घसरण होईल. गतवर्षी १२ डिसेंबर रोजी रत्नागिरी आंब्याची आवक झाली होती. याबाबत बी. जे. देशमुख यांनी सांगितले की,शेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला भाव मिळाला पाहिजे.

Web Title: 1st Ratnagiri 'Hapus' alphonso mango arrived at Pune market yard for selling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.