शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Zilla Parishad Election : मावळात पंचायत समितीसाठी १९, तर जिल्हा परिषदेसाठी १० अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:10 IST

- आज अखेरची मुदत : टाकवे बुद्रुक गट, नाणे गणाकडे तालुक्याचे लक्ष

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मंगळवार (दि. २०) अखेर पंचायत समितीच्या १० गणांसाठी १९, तर जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. टाकवे बुद्रुक (जि.प.) आणि नाणे (पं.स.) या अनुसूचित जमातीसाठी (एस.टी.) राखीव असलेल्या जागांवर अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.

निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहायक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यात ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नामांकन दाखल करण्यासाठी आता बुधवारचा एकच दिवस असल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीत महिला आणि सर्वसाधारण जागांवर इच्छुकांची मोठी गर्दी आहे.पंचायत समितीसाठी

पंचायत समितीच्या टाकवे बुद्रुक (सर्वसाधारण महिला), वराळे (सर्वसाधारण) आणि कार्ला (सर्वसाधारण महिला) या तीन गणांमध्ये प्रत्येकी तीन अर्ज दाखल झाले आहेत. त्याखालोखाल इंदोरी (सर्वसाधारण), कुसगाव बुद्रुक (सर्वसाधारण), सोमाटणे आणि चांदखेड या गणांमध्ये प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत; तर खडकाळा (अनुसूचित जाती) आणि काले (सर्वसाधारण) गणांत प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. मात्र, नाणे येथील अनुसूचित जमाती (महिला) या राखीव जागेवर अद्याप पाटी कोरीच आहे.

जिल्हा परिषदेसाठी

जिल्हा परिषदेच्या आखाड्यातही चुरस निर्माण झाली आहे. पाच गटांसाठी एकूण १० अर्ज आले आहेत. यामध्ये इंदोरी (सर्वसाधारण महिला) आणि खडकाळा (सर्वसाधारण महिला) या दोन्ही गटांत तिथे प्रत्येकी तीन अर्ज दाखल झाले आहेत. कुसगाव बुद्रुक (सर्वसाधारण) आणि सोमाटणे (सर्वसाधारण महिला) गटात प्रत्येकी दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. टाकवे बुद्रुक ही जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहे, मात्र तिथेही आजअखेर एकही अर्ज दाखल झालेला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Maval Zilla Parishad Election: 19 Panchayat Samiti, 10 ZP Nominations Filed

Web Summary : Maval elections see increased activity. 19 Panchayat Samiti and 10 Zilla Parishad nominations filed. ST reserved seats remain vacant.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड