शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

हेल्मेट न घालणाऱ्याला १८ हजार ७०० " दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:18 PM

३७ वेळा सीसीटीव्हीत कैद : वाहतूक शाखेने काढले टॉप १००

विवेक भुसे 

पुणे : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वाहतूक पोलिसांनी आता हेल्मेटसक्ती बंद केली असा कोणाचा समज असेल, तर तो चुकीचा आहे़ त्यामुळे हेल्मेट न घालता तुम्ही शहरात फिरत असाल, तर वाहतूक पोलिसांचा तिसरा डोळा तुमच्यावर कधी रोखला जाईल व तुमच्या नावाने कधी चलन फाडले जाईल हे सायंकाळी एसएमएस मिळाल्यावरच समजेल.़ हेल्मेट न वापरणाऱ्यांना सीसीटीव्हीने कैद केले असून, एका वाहनचालकाने हेल्मेट न घातल्यामुळे त्याला तब्बल १८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला आहे.

वाहतूक पोलिसांनी आता हेल्मेटसक्तीसाठी प्रत्यक्ष पोलिसांचा वापर करण्याऐवजी सीसीटीव्हीमार्फत कारवाईवर भर दिला आहे़ १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती व अन्य वाहतूक नियमांच्या भंगाबाबत सीसीटीव्हीमार्फत केलेल्या कारवाईची एकत्र माहिती घेतली असून, त्यात सर्वाधिक दंड झालेल्या दुचाकी चालकांची यादी तयार केली आहे़. त्यात पर्वती दर्शन येथील एका वाहनचालकावर तब्बल १८ हजार ५०० रुपये दंड आकारणी झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्याखालोखाल कोथरूडमधील एकाला १५ हजार ३०० रुपये दंड झाला आहे़ ८ हजार व ८ हजार ५०० रुपये दंड झालेले तब्बल २५ दुचाकी वाहनचालक आहे़ तर ७ हजार व ७ हजार ५०० रुपये दंड झालेले २१ वाहनचालक आहेत़. त्यानंतर १० हजार व ९ हजार रुपये दंड झालेले प्रत्येकी १० वाहनचालक आहेत़ १२ हजार ६०० रुपये दंड झालेले ९ वाहनचालकांचा या यादीत समावेश आहे. पर्वतीदर्शन येथील वाहनचालकाला १८ हजार ७०० रुपये दंड झाला आहे़ याचा अर्थ त्याने हेल्मेट न घातल्याने त्याला किमान ३७ वेळा सीसीटीव्ही कॅमेºयाने पकडले व एका वेळा त्याने झेब्रा क्रॉसिंगला उभा असताना पकडला गेला असावा असे दिसते़ या जास्तीतजास्त दंड झालेल्या पहिल्या शंभर वाहनचालकांमध्ये ५ हजार ५०० रुपये दंड झालेले शेवटी आहे़ हे पाहता ९८ जणांना किमान ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दंड झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत वाहतूक शाखेने हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करताना दीड कोटी रुपयांहून अधिक रकमेची दंडाची कारवाई केली आहे़ मात्र, हा दंड भरण्याकडे वाहनचालकांनी दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कारवाई केली असली तरी त्याची वसुली अद्याप झालेली नाही़, त्यामुळे आता पोलिसांनी दंड झालेल्या वाहनचालकांचे पत्ते मिळविले आहेत़ त्यांना दंडाबाबतची नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़नोटीसा देणार : हेल्मेट नसल्यास ५०० रुपये दंडएकदा हेल्मेटविना आढळल्यास ५०० रूपये दंड आकारला जातो. त्याप्रमाणात जेवढ्या वेळा हेल्मेट नसलेले दुचाकीस्वार सीसीटीव्हीमध्ये कैद होतील, त्याप्रमाणात त्यांना दंड आकारला आहे.या सर्व वाहनचालकांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून हा दंड वसूल केला जाणार आहे.अनेकांना १८ हजार ते ९ हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात आला आहे़ आता १८ हजार रुपये दंड झालेल्या वाहनचालकाकडील दुचाकी जुनी असेल तर त्यांच्या गाडीच्या किमतीपेक्षा त्याला झालेला दंड अधिक असण्याची शक्यता आहे. अनेकदा वाहतूक नियमांचा भंग केलेल्या या वाहनचालकांची आम्ही यादी केली असून, त्यांचे पत्ते मिळविले आहेत़ त्यांच्या घरच्या पत्त्यावर नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़- पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखासीसीटीव्हीमार्फत अधिक वेळा एकाच वाहनचालकावरील कारवाईदंडाची रक्कम चालक(रुपये) संख्या१८ हजार ५०० ११५ हजार ३०० ११४ हजार २१३ हजार २१२ हजार ६०० ९दंडाची रक्कम चालक(रुपये) संख्या११ हजार ५९ हजार १०८ हजार २५७ हजार २१६ हजार ५०० ५सीसीटीव्हीमार्फत कारवाई केल्यानंतर वाहनचालकाचा रजिस्टर असलेल्या मोबाईलवर पावती पाठविण्यात येते़ त्यांनी जवळच्या वाहतूक शाखेत किंवा कार्ड स्वाईप मशीन असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे जाऊन कार्डमार्फत दंड भरावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत़

टॅग्स :Puneपुणे