ओतूर परिसरात १८ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:36+5:302021-07-07T04:12:36+5:30
सोमवारी डिंगोरे ५, उदापूर ४, खामुंडी ३, ओतूर शहर व धोलवड प्रत्येक गावात दोन हिवरे खुर्द आलमे प्रत्येक गावात ...

ओतूर परिसरात १८ नवीन रुग्ण
सोमवारी डिंगोरे ५, उदापूर ४, खामुंडी ३, ओतूर शहर व धोलवड प्रत्येक गावात दोन हिवरे खुर्द आलमे प्रत्येक गावात एक एक असे एकूण १८ नवीन रुग्ण सापडले आहेत. परिसरातील बाधितांची संख्या २ हजार ६१५ झाली आहे. या पैकी २ हजार ४२० बरे झाले आहेत. ६७ जण कोविड सेंटर तर २६ जण घरीच उपचार घेत आहेत. कोरोनामुळे १०२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली. सोमवारी सापडलेल्या नवीन रुग्णाचा अहवाल डॉ. यादव शेखरे यांनी दिला.
सोमवारी डिंगोरे गावात ५ नवीन रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या २६४ झाली आहे. पैकी २४५ बरे झाले आहेत ७ जणांवर उपचार सुरू आहेत. १२ जणांचा मृत्यू झाला आहे.