शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चाकण जाळपोळ व हिंसाचार घटनेतील १८ जणांना अटक, आरोपींना ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 18:47 IST

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान सोमवारी चाकण वाहनांची जाळपोळ व तोडफोफ करण्यात आली होती.

ठळक मुद्देतीनजण अल्पवयीन असल्याने बालसुधार गृहात रवानगी चाकण व आजूबाजूच्या परिसरातील तरुणांमध्ये धरपकड आणि गुन्हे दाखल होण्याच्या भीतीचे सावट

चाकण : चाकण सोमवारी ( ३० जुलै मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान वाहनांची जाळपोळ व तोडफोफ करण्यात आली होती. तसेच पोलिसांवर दगडफेकही झाली होती. या जाळपोळ व हिंसाचार प्रकरणी एकूण १८ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ३ जण अल्पवयीन आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी १५ जणांना गुरुवारी संध्याकाळी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य न्याय दंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी १५ आरोपींना ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.   याप्रकरणी मनोज दौलत गिरी (वय-२३), सूर्यकांत बाळू भोसले (२१), परमेश्वर राजेभाऊ शिंदे(२२), अभिषेक विनोद शाह(१९), विशाल रमेश राक्षे(२६), सत्यम दत्तात्रय कड (१९), समीर विलास कड(२०), रोहिदास काळूराम धनवटे (१९), विकास अंकुश नाईकवाडी (२८), सोहेल रफिक इनामदार (१९), प्रवीण उद्धव गावडे(२३), आकाश मारुती कड(२५), सचिन दिगंबर आमटे (२७), आनंद दिनेश मांदळे (१८), प्रसाद राजाराम खंडेभराड (१८)  अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

..................

धरपकडीच्या वातावरणामुळे तरुणांमध्ये भीतीचे सावट चाकण व आजूबाजूच्या परिसरातील तरुणांमध्ये धरपकड आणि गुन्हे दाखल होण्याच्या भीतीचे सावट आहे. महाविद्यालयातील तरुण गायब झाले असून त्यांनी कॉलेजकडे पाठ फिरवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार ते पाच हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्याची माहिती दिली असून त्यात आपला समावेश होईल की काय अशी अनामिक भीती तरुणांमध्ये आहे.एकूणच त्यामुळे वाहतुकीला कोठेही अडथळा नाही. रस्त्यावर तुलनेने दुचाकी वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसते. चाकण व राजगुरूनगर परिसरातील जनजीवन पूर्ववत सुरु झाले असले तरी तणावाखाली आहे. आता पोलिसांची काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनाम्यानंतर जळीत बसेसचे भाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.  बस स्थानकावर एसटी बस धावू लागल्यानेप्रवाशांची वर्दळ दिसत आहे. 

टॅग्स :ChakanचाकणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाArrestअटकCourtन्यायालय