शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे यांनी बंद केलेले १७ मार्ग पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:57 IST

तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्यांनी रद्दपातल ठरविलेले एक-एक निर्णय पुन्हा अंमलात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविण्यात आले आहे...

ठळक मुद्देपीएमपीच्या वाहतुक विभागाने बंद केलेल्या २७ मार्गांपैकी पुन्हा १७ मार्ग सुरूपीएमपीच्या ताफ्यात सुमारे २०० नवीन मिडी बस दाखल, त्यामुळे हे मार्ग सुरू करणे शक्य

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांचा आणखी एक निर्णय फिरविण्यात आल्याचे समोर आले आहे. केवळ माननीयांच्या आग्रहास्तव सुरू असलेले आणि तोट्यात जाणारे २७ मार्ग बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यापैकी १७ मार्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. तर उर्वरीत दहा मार्ग बंदच ठेवण्यात आले आहेत.पीएमपीचा खर्च कमी करण्यासाठी मुंढे यांनी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी तोट्यात जाणारे २७ मार्ग बंद केले होते. त्यामुळे या मार्गावरील सुमारे ३८ बस अन्य मार्गावर वळविण्यात आल्या. तसेच काही पास केंद्र बंद करणे, पासचा दरात बदल, पंचिंग पास बंद करणे, बेशिस्त कर्मचाऱ्यांचे निलंबन, ठेकेदारांवर जबर दंडात्मक कारवाई असे विविध निर्णय मुंढे यांनी घेतले. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी रद्दपातल ठरविलेले एक-एक निर्णय पुन्हा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न चालविण्यात आले आहे. त्यामध्ये तोट्यातील मार्ग बंद करण्याच्या निर्णयाचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंढे यांच्या या निर्णयाला त्यावेळी प्रवासी संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केला. पण त्याला न जुमानता मार्ग बंद ठेवण्याच्या निर्णयावर ते कायम राहिले.पीएमपीच्या वाहतुक विभागाने बंद केलेल्या २७ मार्गांपैकी पुन्हा १७ मार्ग सुरू केले आहेत. उर्वरीत १० मार्ग बंदच ठेवण्यात आले आहेत. बंद करण्यात आलेल्या बसेसला संबंधित मार्गावर प्रति किलोमीटर केवळ १२ ते ४२ रुपये उत्पन्न मिळत होते. उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याने हे मार्ग बंद करण्यात आले होते. यापैकी काही उत्पन्न वाढू शकणारे १७ मार्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २०० नवीन मिडी बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हे मार्ग सुरू करणे शक्य झाले आहे.----------सुरू करण्यात आलेले मार्ग स्वारगेट- निगडी, स्वारगेट- धायरी, स्वारगेट- महंमदवाडी, भेकराईनगर- स्वारगेट, पुणे स्थानक- हडपसर, पुणे स्थानक- महंमदवाडी, डेक्कन जिमखाना- विद्यानगर, महापालिका भवन- मुंढवा, महापालिका भवन - ईशाननगरी, कोथरुड डेपो- हडपसर, कोथरुड डेपो- महात्मा फुले मंडई, महात्मा फुले मंडई- पटवर्धन बाग, गुजरात कॉलनी- पिंपळे गुरव,  पिंपरी- देहूगाव,  विश्रांतवाडी- आझादनगर, विश्रांतवाडी- आळंदी, वाकड पूल- हिंजवडी फेज-३.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलtukaram mundheतुकाराम मुंढेNayana Gundeनयना गुंडे