शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात कामगारासाठी १६१ निवारागृहे सुरु ; बेघरांसाठी साखर कारखान्यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 18:35 IST

५१ निवारागृहांमध्ये एकूण ३ हजार ४१३ विस्थापित कामगार व साखर कारखान्यांमार्फत सुरु केलेल्या निवारागृहांमध्ये एकूण ३४ हजार २१६ कामगार वास्तव्यास

ठळक मुद्देविविध ठेकेदारांमार्फत ८८ हजार ४९६ कामगारांना अशा एकूण ९१ हजार ९०९ कामगारांना भोजनाची सुविधा

पुणे : विस्थापित कामगारांकरिता पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत ५१ निवारागृहे तर साखर कारखान्यांमार्फत ११० अशी १६१ निवारागृहे सुरु करण्यात आली असून, जिल्ह्यामध्ये एकूण ३७ हजार ६२९ कामगार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. पुणे जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या ५१ निवारागृहांमध्ये एकूण ३ हजार ४१३ विस्थापित कामगार व साखर कारखान्यांमार्फत सुरु केलेल्या निवारागृहांमध्ये एकूण ३४ हजार २१६ कामगार वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत अशासकीय स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासनामार्फत ३४१३ कामगारांना तसेच विविध ठेकेदारांमार्फत ८८ हजार ४९६ कामगारांना अशा एकूण ९१ हजार ९०९ कामगारांना भोजनाची सुविधा पुरविण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बेघरांकरीता पुणे शहर तहसिल कार्यालय व पुणे महानगर पालिका हद्दीतील २० शाळांमध्ये निवारा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. ह्या सर्व व्यक्ती पुणे शहरामध्ये बिगारी काम करणाऱ्या आहेत. सोशल डिस्ट्नसिंगचा (सामाजिक शिष्टाचार) अवलंब करुन एका खोलीत सात किंवा आठ जणांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत दोन वेळा चहा, नाश्ता तसेच जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय सर्वांची दररोज आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे. सर्वांना मास्क, सॅनिटाइझर, साबण, तेल तसेच टॉवेलचा पुरवठा करण्यात आला आहे.पुणे महानगरपालिकेच्या वा.ब.गोगटे विद्यालय निवारा केंद्र, नारायण पेठ, पुणे येथे एकूण ८१ व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये १ नेपाळी व्यक्ती असून तिचे नाव महेंद्र काडाईत आहे. याशिवाय परराज्यातील १६ व्यक्ती तर महाराष्ट्रातील 64 व्यक्ती आहेत.पुणे महानगरपालिकेच्या  नागरवस्ती विकास योजनेंतर्गत रात्र निवारा प्रकल्प, सेनादत्त सांस्कृतिक हॉल, नवी पेठ, पुणे येथे एकूण १२ व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये 1 नेपाळी व्यक्ती असून तिचे नाव देवजा असे आहे. परराज्यातील 2 व्यक्ती तर महाराष्?ट्रातील 9 व्यक्ती आहेत.पुणे महानगरपालिकेचे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे निवारा केंद्र, भवानी पेठ, पुणे येथे एकूण 37 व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये परराज्यातील ५ व्यक्ती तर महाराष्ट्रातील 32 व्यक्ती आहेत. पुणे महानगरपालिकेचे सावित्रीबाई फुले प्रशाला निवारा केंद्र, भवानी पेठ, पुणे येथे एकूण ४९ व्यक्तींना निवारा देण्यात आला आहे. यामध्ये परराज्यातील 14 तर महाराष्ट्रातील 35 व्यक्ती आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामEmployeeकर्मचारी