शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन 16 वर्षाच्या मुलाला मारहाण; चेहऱ्यावर केले मूत्र विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 18:56 IST

शिवजयंती दिनी एकमेकाकडे पाहण्याच्या वादातून एका 16 वर्षीय मुलाला जबर मारहाण करुन त्याच्या चेहऱ्यावर मुत्र विसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.

पुणे : एकमेकाकडे पहाण्याच्या कारणातून झालेल्या वादात हडपसर परिसरातील एका १६ वर्षाच्या मुलाचे ५ जणांच्या टोळक्याने अपहरण करुन नग्न केले. त्यानंतर त्याला कोयता, बेल्टने मारहाण केली. मुलगा बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या तोंडावर या टोळक्याने मुत्र विसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १२ मार्च रोजी मांजरी परिसरात घडला आहे. मारहाण झालेला मुलगा अजूनही बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या प्रकरणी मुलाच्या आईने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे. विनित सूर्यकांत बिरादार ऊर्फ रेड्डी (वय १९, रा. भेकराईनगर), शुभम राजाभाऊ जाधव (वय १९, रा. समर्थनगर, पिंपरी), देविदास ऊर्फ देवा घनश्याम पाहणे (वय २१, रा. क़ाळेपडळ, हडपसर), भारत विशाल राठोड(वय २१, रा. कुंजीर वस्ती, मांजरी), समील कलिंदर शेख (वय २१, रा. घुले वस्ती, मांजरी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेला मुलगा त्याच्या आईवडिलांसह मांजरीत राहतो. शिवजयंतीच्या निमित्ताने १२ मार्च रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा मुलगा कार्यक्रमाला जातो, असे सांगून बाहेर गेला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचा शोध घेतल्यानंतरही न सापडल्याने त्याच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. हडपसर बीट मार्शलला एक मुलगा मांजरी रेल्वे ट्रॅकजवळ बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. मुलगा बेशुद्धावस्थेत असल्याने त्याची ओळख पटली नव्हती. दरम्यान, मारहाण झालेल्या एका मुलाचा व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती लागला. तेव्हा पोलिसांनी हरविलेल्याची तक्रार दिलेल्या मुलाच्या आईवडिलांना हा व्हिडिओ दाखविला. तो पाहून त्यांनी त्यातील मुलगा आमचाच असल्याने सांगितले. त्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयात जाऊन मुलाला पाहिले. तेव्हाही हा मुलगा बेशुद्ध असल्याचे आढळून आले.

या व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. या व्हिडिओवरुन पोलिसांना आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक केली आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस