शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यामध्ये मध्यरात्री 16 वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 09:18 IST

कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर टिकावाने घाव घालून त्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

पुणे - कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर टिकावाने घाव घालून त्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.  या तोडफोडीत 12 मोटारी आणि 4 दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक तरुणांनी हा प्रकार केल्याचे पुढे आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणे होम कॉलनीतील मिलेनियम शाळेजवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला नागरिकांनी आपली वाहने पार्क केली होती. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी हातातील टिकावाने रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांवर घाव घालण्यास सुरुवात केली. एकापाठोपाठ त्यांनी प्रामुख्याने चारचाकी वाहने लक्ष्य केली. अनेक वाहनांच्या काचा त्यांनी टिकावाने फोडल्या. या आवाजाने झोपलेल्या काही जणांना जाग आली. परंतु, घाबरुन ते त्यांच्या घरातच थांबले. एका महिला व पुरुषांनी हा प्रकार पाहिला. पण घाबरुन ते बाहेर येऊ शकले नाही.

या घटनेत पार्क केलेल्या 12 वाहनांची हल्लेखोरांनी तोडफोड केली असून 4 दुचाकी गाड्याही फोडण्यात आल्या आहेत. गाड्यांच्या काचा फोडल्यानंतर त्यांनी टिकाव, कुदळ तेथेच टाकून देऊन पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस मार्शल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. स्थानिक तरुणांनी हा प्रकार केल्याची माहिती पुढे आली असून त्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस