ब्रिटनहून आलेले १६ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:06 IST2020-12-28T04:06:48+5:302020-12-28T04:06:48+5:30
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे राज्यात तिथून परत आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणांतर्गत ...

ब्रिटनहून आलेले १६ जण बाधित
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे राज्यात तिथून परत आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणांतर्गत शनिवारपर्यंत ११२२ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. शुक्रवार पर्यंत तिघे जण बाधित आढळून आले होते. हा आकडा शनिवारी १६ वर पोहचला. त्यामध्ये पुण्यातील दोघांसह नागपूर ४, मुंबई व ठाणे प्रत्येकी ३ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १ जणांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी पुण्यातील एनआयव्ही येथे पाठविण्यात येत आहेत.
दरम्यान, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत शोधण्यात आलेल्या ७२ जनांपैकी दोघे कोरोना बाधित आढळले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
-----