शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

पुणे महापालिकाच उठली झाडांच्या जीवावर : रस्ता रुंदीकरणादरम्यान घेणार १५० वृक्षांचा बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 4:59 PM

झाडे लावा-झाडे जगवा अशा वाक्यांनी भिंती रंंगवणारी महापालिका मात्र, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तब्बल १५० झाडांचा बळी घेणार आहे.

ठळक मुद्देगंगाधाम चौक ते शत्रूंजय मंदिर चौकादरम्यान सुरु आहे कामविविध प्रजातींचे हे वृक्ष बाधित होणार असून याबद्दल पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून नाराजी व्यक्त

- लक्ष्मण मोरे- पुणे : शहरभर  झाडे लावा-झाडे जगवा अशा वाक्यांनी भिंती रंंगवणारी महापालिका मात्र, गंगाधाम चौक ते शत्रूंजय मंदिर चौकादरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तब्बल १५० झाडांचा बळी घेणार आहे. विविध प्रजातींचे हे वृक्ष बाधित होणार असून याबद्दल पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या बांधकाम साईट्स आणि लग्न, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वारपल्या जाणाऱ्या लॉन्सच्या सोईसाठीच हा घाट घातला जात असल्याचे चित्र आहे.  पालिकेच्यावतीने या रस्त्यावर ३० फुटी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या कामासाठी पथ विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाकडून १६ जानेवारी २०१९ रोजी नकाशासह प्रस्ताव सादर केला होता. याच कार्यालयाकडून रस्ता रुंदीकरणाच्यादरम्यान येणारे वृक्ष काढण्याबाबत वृक्ष प्राधिकरण विभागाकडून अर्ज दिला होता. त्यानुसार, महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन, सुधारणा अधिनियम १९७५ च्या कलम ८/३ अन्वये जाहीर नोटीस देण्यात आली आहे. हे वृक्ष तोडण्यास तसेच पुनर्रोपण करण्यासंदर्भात या अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, खात्यामार्फत व उच्च न्यायालयात यांनी गठीत केलेल्या तज्ञ समितीमार्फत समक्ष जागा पाहणी केली. या प्रस्तावाला महापालिका आयुक्त तथ प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव यांनी मान्यता दिलेली आहे. खात्याने आणि तज्ञ समितीने यासंदर्भात अभिप्राय दिले आहेत. खात्याने यातील २० वृक्ष काढण्यास तसेच १३० वृक्ष पुनरोपन करण्याचा अभिप्राय दिला आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडून या रस्त्यावरील झाडांवर क्रमांक टाकण्यात आले असून प्रत्येक झाडावर नोटीस लावण्यात आलेली आहे. जवळपास दहा पानांची ही नोटीस प्रत्येक झाडावर खिळे ठोकून लावण्यात आलेली आहे. बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये सुभाभूळ, निलगिरी, वड, पिंपळ, उंबर, चींच, कदंब, करंज, अर्जून, हिरडा, बेहडा, आवळा, बदाम, फायकस, वाळवा, टरमेलीया, बकुळ, मोहगणी, पेरु, चाफा, औदुंबर, नीलमोहोर, सप्तपर्णी, खाया, आरेका पाम, कडुनिंब, पेंटाफोरम, अशोक, फिश टेल, बांबू, पेल्टोफोरम आदी प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे. ====रस्त्याच्या रुंदीकरणासह परिसराचा विकासही आवश्यक आहे. मात्र, पर्यावरण रक्षण आणि संवर्धनही आवश्यक आहे. पालिका याठिकाणी भूसंपादन प्रक्रिया राबवून रस्ता रुंदीकरण करु शकली असती. मात्र, येथे सुरु असलेल्या बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या साईट्स आणि बडे लॉन्स मालक यांच्या फायद्यासाठी वृक्षांचा बळी दिला जात आहे. पालिकेने वेगळ्या पयार्याचा विचार करुन या वृक्षांचे जतन करणे गरजेचे आहे. या वृक्षतोडीला आमचा विरोध आहे. आमच्या संस्थेने आक्षेप नोंदविला असून ही वृक्षतोड रद्द न केल्यास  चिपको आंदोलन करण्यात येईल. - यासीन शेख, अध्यक्ष, जयहिंद फाऊंडेशन=====तज्ञ समितीने दिलेल्या अभिप्रायात तीन वाळलेले वृक्ष काढण्यास शिफारस केली आहे. तर २१ वृक्ष पूर्णपणे काढण्याची आणि १२६ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची शिफारस केली आहे. चांगल्या जागेत शास्त्रीय पद्धतीने झाडे सुस्थितीत येईपर्यंत पाणी व मनुष्यबळाच्या व्यवस्थेसह पुनरोपण करावे. तसा आराखडा विभागाला सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. यासोबतच पथ विभागाने देशी वृक्षांना प्राधान्य देऊन प्रस्तावित रस्त्याच्या दुतर्फा आणि परिसरातील अन्य रस्त्यांच्या दुतर्फा तीन मीटरच्या अंतराने लावावेत. या झाडांभोवती सिमेंट कॉंक्रीटविरहीत आळी करुन लागवड करावी तसेच वृक्ष प्राधिकरण / उद्यान विभागाने  पुनरोर्पीत व नवीन वृक्ष लागवडीची नोंद घ्यावी असेही अहवालात नमूद केले आहे. =====गंगाधाम चौक ते शत्रूंजय मंदिर चौकादरम्यानच्या १.३ किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पथ विभागामार्फत आठ महिन्यांपासून सुरु आहे. या कामामध्ये १५० वृक्ष बाधित होणार आहेत. खात्याने आणि तज्ञ समितीने दिलेल्या शिफारशीनुसार काही झाडे पदपथाच्या कडेला लावण्यात येणार आहेत. त्यांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. तर काही वृक्ष काढून टाकण्यात येणार आहेत. ठेकेदाराकडून वृक्षांचे पुनर्रोपण करुन घेतले जाणार आहे.- अविनाश सकपाळ, सहायक महापालिका आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय====बाधित होणाºया वृक्षांची आकडेवारी

वृक्षाचा प्रकार        संख्याकरंज            01वाळवा            01बदाम            06फायकस            05गुलमोहोर            13औदुंबर            02टरमेलीया            02बकुळ            02मोहगणी            02पेरु            01चाफा            02अरेका पाम            02सुभाबूळ            19खाया            03सप्तपर्णी            08पेंटाफोरम            14निलगिरी            12कडुलिंब            06वड            01औदुंबर            01मुचकुंद            02नीलमोहोर            02बॉटल पाम            02अशोक            02नारळ            01जांभूळ            01फिश टेल पाम        11बांबू            19रेन ट्री            01बुच            01पेल्टोफोरम            01वठलेले            03

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका