भोर तालुक्यातील १५ गावे प्रतिबंधित क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:42+5:302021-04-25T04:09:42+5:30
भोर: तालुक्यातील १५ गावांत एक हजार ११४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केली ...

भोर तालुक्यातील १५ गावे प्रतिबंधित क्षेत्र
भोर: तालुक्यातील १५ गावांत एक हजार ११४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केली आहे. या गावांमध्ये पुणे-सातारा महामार्गावरील १० गावांचा समावेश असून वेळू गावात सर्वाधिक १६६ रुग्ण आढळले आहे, तर सर्वांत कमी नाटंबी गावात १५ बाधित आढळले. दरम्यान, या गावांमध्ये १ मेपर्यंत रुग्णालये आणि मेडिकल वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.
तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गावरील व इतर ठिकाणची प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेली गावे आणि गावातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे: सारोळे (७१), किकवी (४९), नसरापूर, (१४८), केळवडे (३४), वर्वे बुदुक (३१), वेळू (१६६), शिवरे (५३), शिंदेवाडी (१२८), ससेवाडी(४५), नाटंबी (१५), संगमनेर (८९),भोलावडे (८४),उत्रौली (७९), खानापूर (३०), हातवेबु (९४) अशी एकूण एक हजार ११४ कोरोनाबाधित आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रात नाकाबंदी करण्यात आली असून गावातील लोकांना महत्त्वाचा कामाशिवाय गावाबाहेर पडता येत नसून बाहेरील लोकांनाही गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आल्याचे तहसीलदार अजित पाटील व
गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.
सदरची १५ गावांसह तालुक्यातील १४४ गावांत कोरोनाचा शिरकाव झालेला असून आत्तापर्यंत एक हजार ३६७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. वाढती आकडेवारी पाहता प्रशासनाकडून कडक निर्बंधासह सदर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिल्या आहेत
तालुक्यात १९६ गावांपैकी १५ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
भोर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढताना दिसतोय तालुक्यातील १९६ गावांपैकी १५ गावे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.यामुळे सदर गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणार आहे.