शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

स्कायरनवे कंपनीच्या विरोधात १५ तक्रारी, नेटवर्क मार्केटिंगचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 01:55 IST

नेटवर्क मार्केटिंगचा प्रकार : नोकरीसाठी भरावे लागतात ४३ हजार; तरुणांना मिळताहेत धमक्या

नºहे : नºहे-धायरी येथील श्री कंट्रोल चौकाजवळ असणाऱ्या स्कायरनवे या नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीच्या विरोधात जवळजवळ १५ तरुण- तरुणींनी पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. नºहे-धायरी परिसरात असणाºया या कंपनी मार्केटिंगसाठी एक साखळी तयार करत असून यामध्ये संबंध महाराष्ट्रातील बेरोजगारांना टार्गेट करून जॉबसाठी म्हणून त्यांच्याकडून दोन हजार रुपये भरून पाच दिवसांचे ट्रेनिंग दिले जाते. या पाच दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये नोकरी बद्दल नकारात्मकता निर्माण करून बिझनेस करा आणि बिझनेसमध्ये लाखो रुपये कसे कमावता येतात, याबद्दल सांगितले जाते. त्यानंतर ४३ हजार रुपये भरा मग आमच्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर बना असे सांगितले जाते. डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्यानंतर मात्र, आता तुम्ही तुमच्या खाली अजुन बाकी लोक जोडा मग तुम्हाला ९००० रुपये कमिशन स्वरूपात मिळतील. अशा साखळी पद्धतीचे स्वरूप कंपनीचे आहे. मुळात जॉब आॅफरची जाहिरात ही सोशल माध्यमातून तसेच माऊथ टू माऊथ कंपनीच्या मार्केटिंग तरुण-तरुणींना करायला सांगून बाकीच्या नवीन तरुणांनाही कंपनी जॉईन करायला भाग पाडते.यावेळी कमी वेळात तुम्हाला जास्त पैसे मिळतील तसेच कंपनीतर्फे तुम्हाला लाइफ टाइम लायसन्स मिळेल, सोन्याचा बिल्ला, स्पोर्ट्स बाइक, परदेशी सहल आणि महिना १ ते ३ लाख रुपये फायदा मिळेल आदी प्रकारची खोटी स्वप्ने दाखविण्यात येतात. ट्रेनिंगनंतर आलेल्या नवीन तरुण-तरुणींना मुलाखतीसाठी बसविले जाते. परंतु मुलाखत हा एक दिखावा असून प्रत्यक्षात निवड ही पैसे भरण्याच्या ऐपतीवर केली जाते, असेही तरुण- तरुणींनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.तक्रारदार तरुणांना धमक्याही मिळत असल्याची तक्रारयातील काही तक्रारधारकांना बºयाच लोकांच्या नावे फोनवर धमक्या येत असून त्यामुळे बाकीचे तरुण-तरुणी तक्रार द्यायलाही घाबरत आहेत. याबाबतीतही तरुणांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करीत आहेत.माझे शिक्षण बीई सिव्हिल झाले असून मी आतापर्यंत ४५ हजार रुपये कंपनीकडे भरले असून शिवाय कंपनीसाठी सहा महिने काम केले, या काळात मला जेवणाकरातही पैसे नसायचे. खोट्या आमिषाला मी बळी पडलो. कंपनीवर कायदेशीर कारवाई व्हावी, हीच अपेक्षा आहे. तसेच बाकी तरुणांचे पैसे वाचावेत. - शुभम बुरसे, तक्रारदारमी सातारा जिल्ह्यातून असून मी कुरियर कंपनीचा जॉब सोडून ही कंपनी जॉइन केली. ४५००० रुपये भरले, शिवाय ४ महिने कामही केले. मला एकही रुपया मिळाला नाही.- सूरज मोर, तक्रारदारमाझा आयटीआय कोर्स झाला असून मित्रांकडून मला व्हॉट्सअ‍ॅपवर जॉबची जाहिरात बघायला मिळाली. त्यानुसार मी कंपनी जॉईन केली. मी एकूण ४३,८०० रुपये भरले आणि फसलो गेलो.- संकेत कुलवाडे, तक्रारदारआम्ही वस्त्रे विक्रीचा व्यवसाय करीत असून आम्ही प्रशिक्षण देतो. कपडे विक्री करण्यापूर्वी कंपनीची ध्येये स्पष्ट करतो, हा नेटवर्किंग मार्केटिंग व्यवसाय असून, सध्या कंपनीसोबत ५०० लोक काम करत आहे. तसेच आम्ही आमचा व्यवसाय हा कायदेशीररित्या करीत असून आम्ही कोणालाही फसवत नाही.- अभिजित सुतार,स्कायरनवे कंपनी, संचालक

टॅग्स :Puneपुणे