लोकअदालतीमध्ये १४१ दावे निकाली
By Admin | Updated: February 14, 2017 01:38 IST2017-02-14T01:38:43+5:302017-02-14T01:38:43+5:30
‘वेळ व पैसा वाचवण्यासाठी; तसेच कौटुंबिक व सामाजिक संबंध टिकविण्यासाठी पक्षकारांनी आपले वाद सामंजस्याने मिटवावेत,’

लोकअदालतीमध्ये १४१ दावे निकाली
राजगुरुनगर : ‘वेळ व पैसा वाचवण्यासाठी; तसेच कौटुंबिक व सामाजिक संबंध टिकविण्यासाठी पक्षकारांनी आपले वाद सामंजस्याने मिटवावेत,’ असे आवाहन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी राजगुरुनगर येथे केले.
राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय महालोकअदालतीचे आयोजन केले होते. या वेळी सहन्यायाधीश अतुल सलगर, एस. के. दाभाडे, पी. ए. साबळे, कनिष्ठस्तर न्यायालयाचे न्यायाधीश वाय. जे. तांबोळी, एच. डी. देशिंगे, एस. जे. कातकर, सरकारी वकील अरुण ढमाले, गिरीश कोबल, रजनी नाईक, राजीव तडवी, अनिल चुकेवाड, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक, उपाध्यक्ष अॅड. संदीप रेटवडे, सचिव अॅड. अमोल घुमटकर, अॅड. संदीप मलघे, अॅड. शंकर कोबल, अॅड. अनिल वाडेकर, ज्येष्ठ विधितज्ज्ञ अॅड. बी. एम. सांडभोर, अॅड. माणिक पाटोळे, अॅड. पोपटराव तांबे, अॅड. रघुवीर गायकवाड, अॅड. वैभव कर्वे, अॅड. संजय पानमंद, अॅड. योगेश साबळे, अॅड. सविता भोर यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.
१९५० विविध प्रकारचे खटले ठेवण्यात आले होते. त्यापैकी १४१ खटले निकाली काढण्यात आले. पॅनल जज्ज म्हणून सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नाईकरे, हेमलता टाकळकर, नाना थिगळे, दत्तात्रय लांडे, गीताराम टाकळकर, रोहिदास होले, वासुदेव मुळूक यांनी काम पाहिले.