पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाक्याजवळ ३ लाख रुपयांचा १४ किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:52 IST2024-12-14T11:51:45+5:302024-12-14T11:52:00+5:30

एका तस्कराला सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत अटक करण्यात आली.

14 kg of ganja worth Rs 3 lakh seized near Kavadipat toll plaza on Pune-Solapur highway; one smuggler arrested | पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाक्याजवळ ३ लाख रुपयांचा १४ किलो गांजा जप्त

पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाक्याजवळ ३ लाख रुपयांचा १४ किलो गांजा जप्त

लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाक्याजवळ ३ लाख १३ हजार ८४० रुपये किंमतीचा १४ किलो १८२ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. साहिल विनायक जगताप (वय-२८, रा. हनुमान नगर, साईबाबा मंदिरा जवळ, केळेवाडी, कोथरुड पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका तस्कराला सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ शुक्रवारी (दि. १३) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई लोणी काळभोर पोलीस व पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक एकच्या पोलिसांनी संयुक्तरीत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करण्याकरीता अंमली पदार्थ विरोधी पथक-१ व लोणी काळभोर पोलीस हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.

गस्त घालत असताना, पोलिसांना लोणी टोलनाका जवळ, रेड्डी हॉटेल शेजारी गांजाची तस्करी होणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी साहिल जगताप याला मोठ्या शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये ३ लाख १३ हजार ८४० रुपये किंमतीचा सुमारे १४ किलो १८२ ग्रॅम गांजा आढळून आला.

ही कारवाई पुणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत खोसे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, सुजित वाडेकर, योगेश मोहिते, बालाजी बांगर, ईश्वर भगत यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: 14 kg of ganja worth Rs 3 lakh seized near Kavadipat toll plaza on Pune-Solapur highway; one smuggler arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.