शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत १४ दिवस कडक 'जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 8:07 PM

बारामती शहराच्या सीमा चारही बाजुने होणार ‘सील’

बारामती : बारामती शहर तालुक्यात गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णांनी त्रिशतक पार केले. सलग तीन दिवस कोरोना रुग्णांचा आलेख चढता राहिल्याने प्रशासन हादरले.अखेर प्रशासनाने कडक निर्बंध लागु करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. यामध्ये मेडिकल,दूध वगळता सर्व सेवा,व्यवसाय बंद राहणार आहेत. बारामती शहराच्या सीमा चारही बाजुने ‘सील’ करण्यात येणार आहे.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,  पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्यधिकारी किरणराज यादव यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार बारामती तालुका व शहर दि ७ सप्टेंबर ते २१ पर्यंत जनता कर्फ्यु राहणार आहे.

शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहर कडक लॉकडाऊन असणार आहे. याबाबत आज नगराध्यक्ष  तावरे यांनी पत्रकारांच्या बैठकीत सांगितले की, शहरातील मागील चार दिवसातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० टक्के एवढी आहे.त्यामुळे वैद्यकीय सेवा ढासळू नये यासाठी चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. पुढील चौदा दिवस कोणालाही अत्यावश्यक सेवा वगळता घरातून बाहेर पडता येणार नाही.तसेच शहरातून बाहेर किंवा बाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही.

तालुक्यातील कोरोना संसर्गाने  बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.शहरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.जनता कर्फ्युसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. शहरातील खासगी डॉक्टरांनी कोविडच्या कामात हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. 

कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या भागात जनता कर्फ्यू राहणार आहे. तरतालुक्याबाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही प्रत्येक गावातीललोकांनी अत्यावश्यक सेवा वगळता आपल्या गावाची सीमा बंद करायची आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे व्यवसाय, हातगाडी, अन्य विक्रेते सुरू राहणार नाहीत. यामुळे देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या संदर्भात माहिती साठी डॉ.मनोज खोमणे तर शहरातील नागरिकांनी डॉ. सदानंद काळे व डॉ. पंकज गांधी यांच्याशी व्हाट्सए वर संपर्क साधावा.तसेच आपल्या जवळील खासगी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,असे आवाहन तावरे यांनी केले. आता कोरोना संसर्गाची तपासणी केल्यानंंतर संबंधितांना त्याच थांबविण्यात येणार आहे.त्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला तेथून थेट रुग्णालयात नेणार आहेत.त्यामुळे त्याच्या घरच्या किंवा आसपासच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तर या रुग्णांवर चौदा दिवस रुग्णांवर योग्य इलाज झाल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

......बारामती एमआयडीसीत कंपन्या सुरुच राहणार  बारामती शहर आणि तालुक्यात जनता कर्फ्यु जाहिर करण्यात आला आहे.या दरम्यान शहर  आणि तालुक्याच्या सर्व सीमा सील राहणार आहेत.मात्र,एमआयडीसीतील कंपन्या ,उद्योग नियम व अटींनुसार सुरुच राहणार आहेत. कंपन्यांमधील कामगारांना त्यांचे ओळखपत्र दाखवुन सोडले जाणार आहे,अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.————————————————————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवार