१३ तालुक्यांत फुले-शाहू-आंबेडकर अभ्यासिका
By Admin | Updated: May 10, 2017 03:53 IST2017-05-10T03:53:55+5:302017-05-10T03:53:55+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांत फुले-शाहू-आंबेडकर ग्राम

१३ तालुक्यांत फुले-शाहू-आंबेडकर अभ्यासिका
लोकमत न्यूज नेटवर्क
शेटफळगढे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांत फुले-शाहू-आंबेडकर ग्राम अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहेत. बांधकामाला येत्या महिनाभरात सुरुवात केली जाईल. या अभ्यासिकेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शाश्वत विकास साधण्यास या अभ्यासिकेचा आगामी काळात उपयोग होईल, अशी माहिती बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.
माने म्हणाले, की इंदापूर तालुक्यात अंथुर्णे, बारातमीत
सुपा, पुरंदर तालुक्यात वाल्हे,
दौंडमध्ये खुटबाव, शिरूरमध्ये
न्हावरा, भोरमध्ये केजळ, वेल्हा-मुळशीत पौड येथे, जुन्नरमध्ये नारायणगाव आंबेगावमध्ये
निरगुडसर, हवेलीत लोणीकंद आणि खेड तालुक्यात शेलपिंपळगाव येथे या अभ्यासिकेचे बांधकाम केले जाईल.
या अभ्यासिकेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अभ्यासासाठी पुरेशा संख्येने टेबलखुर्च्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
पुस्तकांसाठी कपाटे, संगणक इंटरनेट, वायफाय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कमीत कमी १०० विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेत जागा उपलब्ध होईल.