गण, गटासाठी १२७ अर्ज दाखल
By Admin | Updated: February 7, 2017 03:10 IST2017-02-07T03:10:55+5:302017-02-07T03:10:55+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असल्यामुळे येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयात उमेदवारांच्या समर्थकांनी अलोट गर्दी केली होते

गण, गटासाठी १२७ अर्ज दाखल
वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असल्यामुळे येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयात उमेदवारांच्या समर्थकांनी अलोट गर्दी केली होते. शहरात जत्रेचे स्वरूप आले होते.
सोमवारी एकूण १२७ अर्ज दाखल झाले. पंचायत समितीच्या दहा जागांसाठी ८८ तर जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी ३९ अर्ज दाखल झाले. या वेळी सर्व पक्षीय व अपक्ष उमेदवारांनी समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करून वाजत गाजत ढोल लेझीमच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल केले. मिरवणुकामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. उमेदवारांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात अर्ज दाखल केले.
उमेदवार समर्थकांसह सकाळपासूनच येथील मुख्य रस्त्यावर हजर झाले होते. सर्व राजकीय पक्षांचे झेंडे लावलेल्या वाहनांनी महामार्ग सेवा रस्ता
फुलून गेला होता. उमेदवारांबरोबर कार्यकर्त्याचा उत्साह ओसंडून
वाहत होता. उमेदवार पोटोबा मंदिरात दर्शन घेऊन तेथून पदयात्रा, मिरवणूक, ढोल ताशा व पारंपारिक वाद्यांच्या गजरात उमेदवार अर्ज भरण्यासाठी जात असल्याचे चित्र शहरभर दिसत होते. (वार्ताहर)