शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
3
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
4
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
5
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
6
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
7
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
8
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
9
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
10
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
11
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
12
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
13
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
14
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
15
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
16
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
17
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
18
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
19
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
20
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?

कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा इंदापुरातील कळसमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 3:38 PM

कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मुलीचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने बूडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी कळस (ता. इंदापूर) येथे घडली. अनिता सर्जेराव खारतोडे (वय १२) असे त्या मुलीचे नाव आहे. 

ठळक मुद्देकपडे धुवत असताना तिचा पाय घसरुन पडली पाण्यात तातडीने खासगी रुग्णालयात करण्यात आले दाखल, डॉक्टरांनी केले मृत घोषित

कळस : कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मुलीचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने बूडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी कळस (ता. इंदापूर) येथे घडली. अनिता सर्जेराव खारतोडे (वय १२) असे त्या मुलीचे नाव आहे. येथील शरद राजेभोसले यांच्या विहिरीवर अनिता सकाळी कपडे घेवून धुण्यासाठी गेली होती. कपडे धुवत असताना तिचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. बराच वेळ झाला तरी कपडे धुवून अनिता का परतली नाही, म्हणून घरच्यांनी तिचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र विहिरीवर केवळ कपडे आढळून आले. तिचा इकडे तिकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यामुळे ती पाण्यात पडली असावी असा अंदाज लावून नातेवाईक तरुणांनी पाण्यात उतरून तिचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र पाण्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या पाणगवतामुळे तळापर्यंत शोध घेणे जिकिरिचे ठरत होते. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर तिचा मृतदेह पाण्यात तळाशी आढळून आला. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सुरेंद्र वाघ पुढील तपास करत आहेत. अनिता ही येथील श्री हरणेश्वर विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होती. शिक्षणाबरोबर आई-वडिलांना ती घरकामात नेहमीच मदत करत असे. सुट्टीच्या दिवशी शेतकरी असलेल्या वडिलांना शेतीकामात मदत करत असे. तिच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणे