शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कोंबडी चोरांचा सुळसुळाट! चोरट्यांनी चक्क कोंबड्यांनी भरलेला टेम्पोच लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 11:28 IST

संपूर्ण टेम्पो लंपास केल्याची घटना...

वडगाव मावळ : नायगयाव गावच्या हद्दीतील जुना मुंबई-पुणे महमार्गावरील अहिरवडे फाट्यावर कोंबड्या चोरांनी बुधवारी (दि.३०) मध्यरात्री बॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो अडवून टेम्पो चालक व सहचालकास शस्त्रांचा धाक  दाखवून कोंबड्यांचा संपूर्ण टेम्पो लंपास केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात टेम्पो चालक चालक यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.३०) रात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास टेम्पो चालक जमाल अहमद अताउल्ला खान, ( वय ३५ वर्ष) हे टाटा कंपनीचा ७०९ मॉडेलचा टेम्पो (क्र. एम एच ४३ बीपी ५२०४) मध्ये पोल्ट्री फार्मचे जिवंत कोंबड्यांचा माल जात होते. त्यावेळी टेम्पो नायगयाव गावच्या हद्दीतील मिनी महल हॉटेलचे समोर आला असताना एका पांढऱ्यां रंगाच्या बुलेटवर आलेल्या चार अनोळखी इसमांनी सदरचा टेम्पो रस्त्यात अडवला. त्यानंतर टेम्पो चालकाला आणि क्लिनरच्या गळ्याला कोयता लावून, हाताने मारहाण करून टेम्पो व त्यातील माल असा एकूण रुपये १२ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जबरदस्तीने चोरी करून पुण्याच्या दिशेने पसार झाले.

या संदर्भात टेम्पो चालक खान यांनी पोलीस ठाण्यात दिललेल्या तक्रारीच्या तपासाच्या अनुषंगाने कामशेत पोलिसांचे पथक तपास करीत असताना गुरुवारी (दि.३१) पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सदरचा टेम्पो हा मोशी कचरा डेपोकडे जाणारे रोडवर, पुणे नाशिक महामार्गाजवळ, ता. हवेली, जि. पुणे येथे उभा असल्याची माहिती मिळाली. त्यावरून कामशेत पोलीस पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला टेम्पो (क्र. एम एच ४३ बीपी ५२०४) मोशी येथून हस्तगत करून तो पुढील तपासकामी ताब्यात घेतला असून गुन्ह्यातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक फौजदार अब्दुल शेख, पोलीस हवालदार गणेश तावरे, पोलीस नाईक गवारी, दत्ता शिंदे यांचे पथक करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीVadgaon Mavalवडगाव मावळ