शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बंटी बबली संस्थेमार्फत १५० लोकांचे १२ लाख लुटले; गुजरातच्या हिरो-हिरॉईनला पुणे पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 12:24 IST

अनेक गरजू लोकांना पंधरा दिवसात कर्ज उपलब्ध करून देतो अशी खोटं बतावणी करून त्यांच्याकडून पैसे घेतले

किरण शिंदे

पुणे : मायक्रो फायनान्स कंपनी द्वारे कर्ज मिळून देतो असे सांगून 100 ते 150 सर्वसामान्य लोकांचे फसवणूक करणाऱ्या हिरो-हिरोईन यांना अटक करण्यात आली. गुजरातच्या सुरत मधून या दोघांना अटक करण्यात आली. दोघेही युट्युब वर हिरो आणि हिरोईन म्हणून प्रचलित आहे. हेमराज जीवनलाल भावसार आणि दिपाली जितेंद्र पौनीकर (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही सुरतमधील सुमन सार्थक सोसायटी सिंगनपूर येथील रहिवासी आहेत. 

स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघा बंटी बबलीने मायक्रो फायनान्स नावाची खोटी संस्था स्थापन केली. पुण्यातील मुकुंद नगर परिसरात या कंपनीचे कार्यालय थाटलं. त्यानंतर अनेक गरजू लोकांना पंधरा दिवसात कर्ज उपलब्ध करून देतो अशी खोटं बतावणी करून त्यांच्याकडून पैसे घेतले. या दोघांनी जवळपास 100 ते 150 लोकांची बारा लाख तीस हजार रुपयांनी फसवणूक केली. स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. 

स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी गुजरात या ठिकाणी जाऊन या दोघांना अटक केली. त्यांनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? किंवा फसवणूक करणारी त्यांची कुठली टोळी आहे का? लोकांकडून घेतलेली रक्कम त्यांनी कुठे ठेवली याचा तपास आता स्वारगेट पोलीस करत आहे. या दोघांना 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस कर्मचारी तारू, शेख, गायकवाड, घुले, गोडसे आणि होळकर यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेGujaratगुजरातPoliceपोलिसYouTubeयु ट्यूबfraudधोकेबाजी