महाराष्ट्राला केंद्राकडून ११२१ व्हेंटिलेटर, मनुष्यबळासाठीही नॅशनल हेल्थमधून निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:32+5:302021-04-11T04:10:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्राला केंद्राकडून ११२१ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ७०० ...

महाराष्ट्राला केंद्राकडून ११२१ व्हेंटिलेटर, मनुष्यबळासाठीही नॅशनल हेल्थमधून निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्राला केंद्राकडून ११२१ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ७०० गुजरातमधून तर उर्वरित तमिळनाडूहून आणले आहेत. त्याचबरोबर राज्यात मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी नॅॅशनल हेल्थ मिशनमधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
पुण्यात कोरोनावर उपाययोजनेसाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जावडेकर म्हणाले, हे आमचेच राज्य आहे. केंद्राची ३० पथके महाराष्ट्रात कार्यरत आहे. केंद्र सरकारने काय करायला हवे, कशा प्रकारे मदत करता येईल याचा अभिप्राय त्यांनी तयार केला आहे.
चौकट
राज्यात १५ लाख ६३ हजार लसी शिल्लक, पण आरोप- प्रत्यारोपाची वेळ नाही.
कोरोना प्रतिबंधक लसीच्या वादाबाबत जावडेकर म्हणाले आतापर्यंत महाराष्ट्राला १ कोटी १२ लाख डोस मिळाले आहेत. त्यापैकी ९५ लाख वापरले असून १५ लाख ६३ हजार व्हॅक्सिन शिल्लक आहेत. शिल्लक लसींचे योग्य वाटप झाले पाहिजे. मात्र, ही आरोप- प्रत्यारोपाची वेळ नाही. आम्ही राजकारणाचे उत्तर जरुर वेगळे देऊ.