अकरा वर्षानंतर मिळाली 1क् लाख नुकसानभरपाई
By Admin | Updated: June 28, 2014 23:07 IST2014-06-28T23:07:26+5:302014-06-28T23:07:26+5:30
मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात त्यांचे सर्वस्व गेल़े अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसान भरपाई मिळते,

अकरा वर्षानंतर मिळाली 1क् लाख नुकसानभरपाई
>पुणो : मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात त्यांचे सर्वस्व गेल़े अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसान भरपाई मिळते, याची काहीही माहिती त्यांना नव्हती़ त्याविषयी माहिती मिळाल्यावर तब्बल 11 वर्षानंतर त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला़ अपघाताविषयी कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती़, तरीही लोकन्यायालयाच्या माध्यमातून त्यांना नुकसान भरपाई मिळू शकली़
याबाबत हकीकत अशी, विशाल पांडुरंग निम्हण यांचे 28 जानेवारी 2क्क्3 रोजी मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावरील कामशेत येथे अपघातात निधन झाल़े नुकसान भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल करता येतो, याची माहिती त्यांना एका महिलेने दिली़ त्यानंतर अॅड़ अनिरुद्ध पायगुडे आणि अॅड़ वैशाली गव्हाणो यांच्यामार्फत कविता निम्हण यांनी 13 मार्च रोजी वडगाव मावळ न्यायालयात दावा दाखल केला़ युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीकडून 17 लाख रुपये मिळावेत, अशी मागणी त्यात करण्यात आली होती़ (प्रतिनिधी)
4निम्हण यांचा दावा शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात ठेवण्यात आली होता़ निम्हण यांच्याकडे त्यांच्या पतीच्या अपघातासंदर्भात कागदपत्रे नव्हती़ ती वडगाव न्यायालयातून मिळविण्यात आली़ लोकन्यायालयातील न्यायाधीश डी़ एम़ देशमुख यांच्या पॅनेलने सामोपचाराने आणि तडजोडीने हा दावा निकाली काढला़