शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिममध्ये ११ वर्षांच्या मुलावर अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी  

By नम्रता फडणीस | Updated: January 7, 2025 18:01 IST

पुणे : जिममध्ये व्यायाम करणाऱ्या अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तीस वर्षांच्या आरोपीला खेड-राजगुरूनगर येथील विशेष न्यायालयाने ...

पुणे : जिममध्ये व्यायाम करणाऱ्या अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तीस वर्षांच्या आरोपीला खेड-राजगुरूनगर येथील विशेष न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीने अनैसर्गिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमांनुसार गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने विशेष न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी हा निकाल दिला.दरम्यान, आरोपीने दंडाची रक्कम भरल्यानंतर ती पीडित मुलाला भरपाई म्हणून देण्यात यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. आरोपीविरोधात पीडित मुलाच्या आईने तक्रार दिली होती. ही घटना १ जानेवारी २०२२ रोजी जुन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यादिवशी सायंकाळी पाच वाजता तक्रारदारांचा मुलगा जिममध्ये गेला. तो एकटा व्यायाम करत असताना, आरोपी तिथे आला. आरोपीने जिमचे दार-खिडक्या लावून घेत मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत मुलाने रडत-रडत घर गाठले. आईने विचारणा केली असता, त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आईने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी आरोपीविरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ (अनैसर्गिक अत्याचार) आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम ४, ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.उपनिरीक्षक वाय. वाय. पाटील यांनी आरोपीला अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील विकास देशपांडे यांनी बाजू मांडली. त्यांनी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडित मुलाचे वय १६ पेक्षा कमी असल्याने आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ सह पाॅक्सो कायद्याच्या कलम ४, ८ व १२ अन्वये गुन्हा सिद्ध होतो. त्यामुळे त्याला अधिकाधिक शिक्षा ठोठावण्यात, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विकास देशपांडे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय