चिंचवड देवस्थान ट्रस्टची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST2021-05-15T04:08:54+5:302021-05-15T04:08:54+5:30
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे जिल्ह्यातील धार्मिक संस्थांनी कोविड केंद्र अथवा आर्थिक मदतीचे आवाहन पुणे जिल्हा ...

चिंचवड देवस्थान ट्रस्टची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाखांची मदत
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे जिल्ह्यातील धार्मिक संस्थांनी कोविड केंद्र अथवा आर्थिक मदतीचे आवाहन पुणे जिल्हा सह धर्मदाय आयुक्तांनी केले होते. यानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने खारीचा वाटा म्हणून शासनास आर्थिक मदत करण्याचे ठरवले होते. यानुसार शुक्रवारी विधान भवन पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सह धर्मदाय आयुक्त सुधीर बुके व विश्वस्त मंडळाने रकमेचा धनादेश दिला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ,चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, राजेंद्र उमाप, विनोद पवार हे उपस्थित होते.
१४०५२०२१ बारामती—०३