तळेगाव ढमढेरे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची ११कोटी उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:06 IST2020-12-28T04:06:52+5:302020-12-28T04:06:52+5:30
कोरोनाच्या पार्श्भूमीमुळे प्रत्यक्षात ऑफलाईन पदधतीने सर्वसाधारण सभा न घेता ऑनलाईन पदधतीने घेतली. संस्थेची सभासद संख्या १७८ असून भागभांडवल ३ ...

तळेगाव ढमढेरे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची ११कोटी उलाढाल
कोरोनाच्या पार्श्भूमीमुळे प्रत्यक्षात ऑफलाईन पदधतीने सर्वसाधारण सभा न घेता ऑनलाईन पदधतीने घेतली. संस्थेची सभासद संख्या १७८ असून
भागभांडवल ३ कोटी ०७ लाख ८८ हजार ५००, राखीव निधी ५२ लाख ४३ हजार ७३० सभासदांच्या ठेवी २ कोटी ६२ लाख ४० हजार ४७४, बँक कायम ठेव ३९ लाख ८९ हजार २०० तर बँक शेअर्स ३६ लाख ७० हजार आहे. पतसंस्थेने ६ कोटी २५ लाख ४४ हजार ६१५ रुपयांचे कर्जवाटप केले असून संस्थेची एकूण उलाढाल १० कोटी ९३ लाख ०७ हजार ३०७ रुपये असल्याची माहिती मानद सचिव अर्चना गोरे यांनी दिली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजयकुमार गजऋषी, खजिनदार बाळासाहेब गायकवाड, संचालक डॉ दत्तात्रय वाबळे, बाळासाहेब चव्हाण, दत्तात्रय बनसोडे, बाळासाहेब वाणी, राजाराम पुराणे, संचालिका संगीता गवारी, तज्ञ संचालक रावसाहेब वाघमारे, आदी उपस्थित होते.