शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सरसकट पाच हजाराची मदत ; महापालिकेची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 21:37 IST

महापालिका हद्दीतील इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या खासगी शिकवणीसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समाज विकास विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

ठळक मुद्देमंगळवारी स्थायीच्या मंजुरीची अपेक्षा  सर्वच प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची मदत

पुणे: शहरातील खासगी शाळांमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण घेणा-या व एक लाखांच्या आता आर्थिक उत्पन्न असणा-या सर्वच प्रवर्गांतील मुलांना आता सरसकट पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे. या योजनाचा सुधारित प्रस्ताव येत्या मंगळवारी (दि.१०) रोजी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्थायी समिती याबाबत काय निर्णय घेते याकडे शहरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. महापालिका हद्दीतील इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या खासगी शिकवणीसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समाज विकास विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, नववी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दहावीसाठी खासगी शिकवणी घेता येत नाही.आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये व किमान शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी  महापालिकेच्या वतीने मदतीचा हात दिला जातो. यामुळेच महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या नववीतील विद्यार्थ्यांना २ ते ५ हजार रुपये दिले जातात. त्यात खुल्या गटासाठी दोन आणि मागास प्रवगार्तील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात येतात. अशा योजनांसाठी विशेष तरतूद केली जाते. दरम्यान, यासंदर्भात महापालिका प्रशासनाने यापुढे सर्वच प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची मदत द्यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीकडे अभिप्राय पाठविला आहे. -------------------------महापालिकेच्या हद्दीतील सर्वसामान्य घरातील मुलांना देखील आपले शालेय शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची मदत करण्याचा प्रस्ताव अआला आहे. या प्रस्तावावर सर्व पातळ्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ.योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती -------------सरसकट पाच हजार मदत करण्यासाठी केवळ २० लाख वाढीव तरतुद गरजेचीवाढत्या खर्चामुळे शहरातील अनेक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेणे देखील कठीण होते. या पार्श्वभमीवर महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या काही योजनांमध्ये कालानुसार काही किरकोळ बदल करणे आवश्यक आहे. हे बदल केल्यास शहरातील सारखी परिस्थिती असलेल्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पाच हजार रुपये मिळणे शक्य होणार आहे. यामुळे महापालिकेवर वर्षांला केवळ २० लाख रुपयांचा भार पडणार आहे.राणी भोसले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक